शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

कृपा करून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, एकत्र येऊन काम करा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जे झाले ते नियमानुसार झाले. मात्र, काही जण त्याचा बाऊ करून लोकांमध्ये ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : रेमडेसिविर इंजेक्शनबाबत जे झाले ते नियमानुसार झाले. मात्र, काही जण त्याचा बाऊ करून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्यासाठी जिल्हा प्रशासनावर आरोप करीत आहेत. वास्तविक सध्या कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. त्यामुळे कृपा करून गैरसमज पसरवू नका, लोकांमध्ये जनजागृती करा, अशी आर्त हाक जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी रात्री फेसबुक लाईव्हवरून केली.

जिल्हाधिकारी डॅा. राजेंद्र भारूड यांनी जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट व आरोग्य संदर्भातील केलेल्या कामाचा बोलबाला राज्यातच नव्हे तर देशात होत असताना स्थानिक पातळीवर काही लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या विरोधात सातत्याने आरोप होत आहेत. विशेषत: एका संस्थेला दिलेल्या रेमडेसिविरबाबत सातत्याने चर्चा करून आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित संस्थेला रेमडेसिविर कुठल्या नियमानुसार दिले त्याबाबतचे कागदपत्र त्यांनी आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये जाहीर केले. रेल्वे आयसोलेशन बोगी संदर्भातही झालेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र त्यांनी सादर केले. ते म्हणाले, मी या जिल्ह्यात अधिकारी म्हणून आलो आहे. काही दिवसांचा पाहुणा आहे. पण हा जिल्हा तुमचा आहे. जिल्ह्यातील जनतेच्या हितासाठी सर्वांनीच चांगले काम करावे अशी अपेक्षा आहे. कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने जे करायचे ते करीत आहे. प्रत्येक नागरिकाचा जीव वाचविण्यासाठी जे जे शक्य ते प्रशासन करीत आहे. हा जिल्हा ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण झाला असा आपला दावा नाही. पण तीन प्लांट सुरू झाले आहेत. इतरही सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत. जे झाले ते आपण एकट्याने केले नाही. त्यासाठी सर्वांची साथ लाभली म्हणूनच ते शक्य झाले.

जिल्ह्यात आरोग्याच्या खूप काही सुविधा नसताना गेल्या वर्षभरात मोठे काम उभे झाले आहे. अर्थात त्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळत आहे. पण काहीजण हेतूत: वारंवार प्रशासनाविरोधात आरोप करीत आहेत. खरे तर ही वेळ आरोप-प्रत्यारोपाची नाही. लसीकरणाबाबत सर्वत्र उत्साह असतांना जिल्ह्यात मात्र नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.