शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषीत बालकांच्या योग्य सर्व्हेक्षणासाठी नियोजन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषीत बालकांचे सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करावे. अर्भक मृत्यू रोखण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कुपोषीत बालकांचे सर्वेक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करावे. अर्भक मृत्यू रोखण्यासाठी संस्थात्मक प्रसुतींवर भर द्यावा असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले. जिल्हा परिषदेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपायुक्त डी.डी.शिंदे, अरविंद मोरे, सहायक आयुक्त प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, भुपेंद्र बेडसे, सर्व खाते प्रमुख आणि गट विकास अधिकारी      उपस्थित होते. गमे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकूल योजना, रमाई आवास योजनेअंतर्गत अपूर्ण घरकूलांचे काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. पात्र लाभार्थ्यांना घरकूलाचा लाभ देण्यासाठी महाआवास अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. घरकूल बांधकामात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे. यासाठी सर्व यंत्रणेने एकजूटीने काम करावे.           कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करताना एकही बालक सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. माता आणि बालकांच्या पोषणाबाबत जनजागृतीवर भर देण्यात यावा. कुपोषण दूर करण्यासाठी     प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. विशेषत: दुर्गम भागातील बालकांच्या पोषणाबाबत विशेष दक्षता घ्यावी. अर्भक व माता मृत्यू कमी करण्याचे प्रयत्न करावे. संस्थात्मक प्रसृतीवर भर द्यावा. प्रति हजार पुरुषामागे महिलांच्या घटत्या दराबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले. पात्र बचत गटांना डिसेंबर अखेरपर्यंत निधी वितरीत करण्यात यावा. बँकांकडे प्रलंबित प्रकरणांबाबत बँक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनुसार घरकूलांचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्यात येईल, असे गावडे यांनी यावेळी सांगितले. घरकूलांच्या कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणांना दिल्या. गमे यांनी घरकूल योजना, स्वच्छता अभियान, उमेद अभियान, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला बालकल्याण आदी विविध विषयांचा आढावा     घेतला.