अपंग मुलाला खांद्यावर घेऊन पायपीट! रूग्णालयात केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 02:44 IST2020-09-04T02:44:12+5:302020-09-04T02:44:29+5:30

रामजी रुमा वसावे यांचा १६ वर्षीय मुलाला अचानक एका पायाने अपंगत्व आले. त्याला उभे राहणेही जिकरीचे जाऊ लागले. मात्र शेजारचे सर्व शेतात गेले होते.

Pipet with a disabled child on his shoulders! Hospitalized | अपंग मुलाला खांद्यावर घेऊन पायपीट! रूग्णालयात केले दाखल

अपंग मुलाला खांद्यावर घेऊन पायपीट! रूग्णालयात केले दाखल

- किशोर मराठे
वाण्याविहीर : सातपुड्याच्या दुर्गम भागात आजारी रुग्णाला बांबूच्या झोळीत नेण्यासाठी चार लोक न मिळाल्याने वडिलांना अपंग मुलाला खांद्यावर घेऊनच रुग्णालयात न्यावे लागले.
रामजी रुमा वसावे यांचा १६ वर्षीय मुलाला अचानक एका पायाने अपंगत्व आले. त्याला उभे राहणेही जिकरीचे जाऊ लागले. मात्र शेजारचे सर्व शेतात गेले होते. दवाखन्यात नेण्यासाठी कोणीही वस्तीवर नव्हते. मुलाच्या आईला बांबूच्या झोळीचे वजन उचलले जात नव्हते. अशा वेळी पित्यानेच मुलाला वाचविण्यासाठी त्याला थेट खांद्यावर घेतले आणि एक किलोमीटरची चिखलाची पायवाट तुडवली. तेथे दुचाकीची सोय झाली. पाटीलपाडा ते निंबीपाडा हा पुन्हा एक किलोमिटरचा तसाच खाचखळगे आणि चिखलाचा. तो देखील दुचाकीवर पार करण्याचे दिव्य कसेबसे पार पडले. तेथून वाहनाद्वारे आपल्या पोटच्या गोळ्याला गुजरातमधील मालसमट येथील दवाखान्यात दाखल केले.

Web Title: Pipet with a disabled child on his shoulders! Hospitalized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.