कापसावर किटकांचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:20 IST2019-11-22T12:20:05+5:302019-11-22T12:20:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात वाचवलेल्या बोरद ता.तळोदा परिसरातील कापसावर लाल किटकांचा प्रादुर्भाव झाला ...

कापसावर किटकांचा प्रादुर्भाव
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : अतिवृष्टी व सातत्याने झालेल्या पावसात वाचवलेल्या बोरद ता.तळोदा परिसरातील कापसावर लाल किटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. या पिकांची पाहणी करण्याची मागणी पाच दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्याची दखल घेत या पिकांची कृषी विभागामार्फत पाहणी करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी सांगितले.
खरीप हंगामात वरुण राजाने कहरच केला होता. त्यामुळे तळोदा तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यात अन्न-धान्याच्या पिकांसह नगदी पिकांचा देखील समावेश होता. परंतु उशिरा लागवड केलेला कापूस यातून वाचवण्याचा प्रय} शेतक:यांमार्फत करण्यात आला. कापूस वाचल्यामुळे शेतक:यांमार्फत पुन्हा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होऊ लागली. परंतु मोठय़ा कष्टाने वाचवलेल्या कापसावर काही दिवसांपासून या कापसावर लाल किटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये पुन्हा कापूस हातून जाण्याची भिती व्यक्त होऊ लागली.
या भितीपोटी शेतक:यांनी तातडीने प्रशासनाकडे धाव घेत लाल किटकांच्या नियंत्रणासाठी पाहणी करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत या किटकांचा कृषी विभागामार्फत पाहणी करण्यात येणार असल्याचे तळोदा तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी सांगितले. त्यामुळे शेतक:यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.