शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीतून झाला विचार पक्का ग्रामपंचायतीत वाढला मतदानाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क ...

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ७० हजार मतदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल, अशी अपेक्षा होती. परंतु त्यातुलनेत तीन टक्के कमीच मतदान झाले होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या वर्षभरानंतर ८७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर प्रशासन अनेक बाबींपासून लांब होते. यातून कोरोना नियमांचे पालन करून निवडणुका घेण्यात आल्या. यातून मतदार जनजागृतीचा एकही कार्यक्रम होऊ शकला नाही. यातून २२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ६४ ग्रामपंचायतींत मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या सर्वच तालुक्यात मतदानाची टक्केवारी ही ५० टक्केपेक्षा अधिक असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. कोणत्याही प्रकारची जनजागृती न करता गेल्या काही वर्षातील जनजागृतीमुळेच हे शक्य झाल्याचे प्रशासकीय सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसभा मतदार संघासाठी मतदान

धुळे जिल्ह्यातील साक्री आणि शिरपूर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. यातून नंदुरबार जिल्ह्याचे सहा आणि धुळे जिल्ह्यातील दोन अशा आठ तालुक्यातील १८ लाख ७० हजार ११७ मतदारांचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. २०१९ या वर्षात सर्व आठ तालुक्यात ६८.३३ टक्के मतदान झाले होते. एकूण मतदारांच्या तुलनेत ११ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळीही प्रशासनाने जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता.

चार मतदारसंघात विभागणी

जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. यात शहादा - तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा - धडगाव आणि नवापूर यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण ११ लाख मतदारांचा यात समावेश आहे. या मतदारांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत सहभाग नोंदवल्याने ६५.५० टक्के मतदान झाले होते. या मतदानासाठीही प्रशासनाने वेळोवेळी उपक्रम राबवत, महिला मतदान केंद्र, विशेष शिबिरांचे आयोजन केले असल्याने ही टक्केवारी वाढली होती.

वर्षभर कोरोनाचा ताप तरीही घटत्या मतदानाला बसला चाप

जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींत एकूण १ लाख ११ हजार २३६ मतदारांचा समावेश होता. यातील ८६ हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तब्बल ७७ टक्के मतदान झाल्यानंतर प्रशासनाने समाधान व्यक्त केले होते. वर्षभर कोरोनासाठी धावपळ करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणत्याही जनजागृती आणि परिश्रमाविनाच मतदानाची टक्केवारी ही ७०च्या पुढे गेल्याने येत्या काळातही जिल्ह्यातील मतदान टक्केवारी वाढणार असल्याचे निर्धारित करण्यात आले आहे.