पावणेदोन लाखांचे लोखंडी पोलची शेतातून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 12:01 IST2019-03-17T12:00:47+5:302019-03-17T12:01:25+5:30

कोळदा शिवारात अमर गोपाल परदेशी यांचे शेत आहे.

Pavadon Lakhs of Iron Pole stolen from the fields | पावणेदोन लाखांचे लोखंडी पोलची शेतातून चोरी

पावणेदोन लाखांचे लोखंडी पोलची शेतातून चोरी

नंदुरबार : शेतात ठेवलेले एक लाख ८९ हजार रुपये किंमतीचे लोखंडी पोल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना कोळदा शिवारात घडली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोळदा शिवारात अमर गोपाल परदेशी यांचे शेत आहे. शेतात त्यांनी शेती कामासाठी २८ लोखंडी पोल आणले होते. या पोलची एकुण किंमत एक लाख ८९ हजार रुपये इतकी आहे. चोरट्यांनी शेतातून सर्वच पोल चोरून नेले. परदेशी यांनी ठिकठिकाणी तपास केला असता मिळून आले नाही. त्यामुळे त्यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सोनवणे करीत आहे. दरम्यान, शेत शिवारातून साहित्य चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वीच दीड लाखांच्या ठिबक नळ्यांची देखील तालुक्यातून चोरी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Web Title: Pavadon Lakhs of Iron Pole stolen from the fields