शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

शहाद्यात डेंग्यूसदृश्य रुग्णांनी खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 10:42 AM

स्वच्छतेचा प्रश्न : सहा बालकांवर उपचार, विविध आजारांचीही लागण

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील मध्यवर्ती भागात अस्वच्छतेमुळे साथीच्या रोगांची लागण होत असून, तूपबाजार व परिसरातील बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या बालकांवर शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून या घटनेने शहरवासीयात खळबळ उडाली आहे. परिसरातील युवकांनी पालिका कार्यालयात जावून संबंधित अधिका:यांची भेट घेऊन या परिसरात तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.शहरातील तूपबाजार, क्रांती चौक, तांबोळी गल्ली, मारवाडी गल्ली, भोई गल्ली, विठ्ठल मंदिर, खोलगल्ली आदी भागातील सांडपाणी वाहून नेणा:या गटारी तुंबल्या असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत पालिका आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करूनही स्वच्छतेची कार्यवाही होत नसल्याने डास-मच्छरांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. 15 दिवसांपासून या भागातील बालके हिवताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी त्रस्त झाले आहेत. काही बालकांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून, रोहित गौरीशंकर बोरसे (नऊ), चेतन सुरेश पाटील (पाच), साई विनोद गुरव (आठ), प्राची भावसार (16), जाणवी मनोज गुरव (सात), आदित्य जैन (आठ) यांना डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आहे.या बालकांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून, पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नियमित साफसफाई होत नसल्याने रोगराई पसरून बालकांना साथीच्या आजारांची लागण होत आहे.शहरातील ज्या भागात अस्वच्छता आहे त्या परिसरात स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी परिसरातील युवक पालिकेत दाखले झाले असता त्याठिकाणी कोणीही जबाबदार अधिकारी, पदाधिकारी त्यांना भेटला नाही. पालिकेचे मुख्याधिकारी गेल्या 10 दिवसांपासून कार्यालयात आलेले नसून, स्वच्छता व आरोग्य विभागातील अधिकारी जागेवर उपलब्ध होत नाहीत. परिसर सफाईच्या बाबतीत दुर्लक्ष केले जात असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिकेकडे फॉगींग मशीन असूनही धुरळणी केली जात नसल्याने डास, मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचा आरोप युवकांनी केला असून, औषध व धुरळीची बिले आरोग्य विभागातर्फे काढली जात असल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला आहे. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांनी या गंभीर विषयाची दखल घेवून शहर स्वच्छता व आरोग्य अबाधीत राखण्यासाठी संबंधीतांना कार्यवाहीचे आदेश द्यावेत, अशी मागणी पालकांच्या वतीने केली जात आहे.