शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील खासगी कोविड सेंटर बंद केल्याने रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या येथील अशशिफा कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर्स आणि टीमने अहोरात्र रुग्णांना सेवा देत शेकडो ...

मार्च २०२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या येथील अशशिफा कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर्स आणि टीमने अहोरात्र रुग्णांना सेवा देत शेकडो रुग्णांना बरे केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी इतर शहरात मिळणाऱ्या महागड्या उपचारापेक्षा अल्पदरात ही सुविधा येथील डॉक्टर देणार असल्याने कोविड रुग्णांच्या उपचाराला परवानगी देण्यात आली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नवापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना अचानक अशशिफा कोविड सेंटरच्या संचालकांनी कोरोना केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमुळे स्थानिक नागरिक बाधित होतील, अशी भीती व्यक्त करूत कोरोना रुग्णांवर होणारे उपचार बंद केले.

याबाबत भाजपचे तालुकाध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, जयंतीलाल अग्रवाल, शहराध्यक्ष प्रणव सोनार, निलेश प्रजापत, स्वप्नील मिस्त्री व कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, अशशिफा कोविड सेंटरच्या संचालकांनी एका प्रतिष्ठित नगरसेवक व धनदांडग्यांच्या सांगण्यावरून गोरगरिबांवर अल्पदरात होणारे उपचार बंद केल्याने रुग्णांचे हाल होत आहे. नवापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जर वेळीच उपचार न मिळाल्यास व त्यामुळे रुग्ण दगावल्यास मृत्यूस जवाबदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित करून उपचार बंद करणाऱ्या अशशिफा हॉस्पिटलच्या संचालकांनी हे केअर सेंटर पुन्हा पूर्ववत सुरू न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोविड रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी अशशिफा हॉस्पिटल शासनाने ताब्यात घेऊन पोलीस बंदोबस्तात हॉस्पिटल सुरू करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.