पतीला वाहन खरेदीसाठी पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 18:47 IST2017-07-29T18:46:07+5:302017-07-29T18:47:00+5:30

जळगाव जिल्ह्यातील तारखेडा येथील आठ जणांविरूद्ध गुन्हा

patailaa-vaahana-kharaedaisaathai-patanaicaa-chala | पतीला वाहन खरेदीसाठी पत्नीचा छळ

पतीला वाहन खरेदीसाठी पत्नीचा छळ

ऑनलाईन लोकमत नंदुरबार, दि.29 : पतीला वाहन घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे यासाठी नवापूरच्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तारखेडा, ता.पाचोरा, जिल्हा जळगाव येथील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

नवापूर येथील कुंभारवाडा भागात राहणारी जागृती सचिन चित्ते (23) या तरुणीचा विवाह तारखेड, ता.पाचोरा येथील सचिन आनंदा चित्ते यांच्याशी दोन वर्षापूर्वी झाला होता. विवाहानंतर जागृती या तारखेडा, भुसावळ रेल्वे क्वॉर्टर आणि अरुणाचल प्रदेशातील आर्मी कॅम्पमध्ये पतीसोबत वास्तव्यास होत्या. या दरम्यान जागृती यांनी पतीला कार घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे यासाठी छळ सुरु झाला. छळाला कंटाळून विवाहितेने नवापूर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पती सचिन आनंदा चित्ते, आनंदा चिंधा चित्ते, लताबाई आनंदा चित्ते, अमोल आनंदा चित्ते, अतूल आनंदा चित्ते, सुमन सुभाष चित्ते व संदीप सुभाष बोरसे (सर्व रा.तारखेडा, ता.पाचोरा) या सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: patailaa-vaahana-kharaedaisaathai-patanaicaa-chala