नळवे शिवारात माथेफिरुने कापली पपई झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:41 IST2019-08-21T12:41:44+5:302019-08-21T12:41:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील नळवे खुर्द शिवारात अडीच एकरातील पपई झाडांची बेसुमार कत्तल केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ...

The papaya plants were harvested by Mathefiru in a tapeworm | नळवे शिवारात माथेफिरुने कापली पपई झाडे

नळवे शिवारात माथेफिरुने कापली पपई झाडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील नळवे खुर्द शिवारात अडीच एकरातील पपई झाडांची बेसुमार कत्तल केल्याचा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला़ घटनेमुळे खळबळ उडाली असून गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी घटना आह़े 
नळवे खुर्द येथील मुकेश जयंतीलाल चौधरी यांनी त्यांच्या अडीच एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती़ सोमवारी सकाळी चौधरी हे पाणी देण्यासाठी शेतात गेले असता अडीच एकरावरील तीन हजारच्या जवळपास झाडे धारदार शस्त्राने कापून फेकल्याचे दिसून आल़े पाच ते सहा फूट उंचीची झाडे मुळापासून उपटून फेकत तसेच काही ठिकाणी कापून फेकल्याचे त्यांना दिसून आले होत़े सूडबुद्धीने हे कृत्य करण्यात आले असावे असा अंदाज आह़े ही माहिती नळवे परिसरातील शेतक:यांना मिळाल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी भेट दिली होती़ सुमारे तीन हजार झाडांची झालेली कत्तल पाहून शेतकरी चौधरी व त्यांचे कुटूंबिय भावनाविवश झाले होत़े घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने उपनगर पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली़ त्यांनी नंदुरबार येथून श्वान पथक बोलावून अज्ञात माथेफिरुचा माग काढण्याचा प्रयत्न केला़ परंतू  श्वान शेतबांधांवर जाऊन घुटमळल़े पोलीसांनी शेतात हत्याचाराचा शोध घेतला असता, झाडे कापून फेकणा:याने ते सोबत नेल्याचे तसेच  माथेफिरुच्या पाऊलखुणाही दिसून आलेल्या नसल्याचे पोलीसांकडून सांगणत आल़े  याप्रकरणी सोमवारी दुपारी मुकेश चौधरी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे करत आहेत़ काही दिवसांपूर्वीच याठिकाणी पपईची झाडे कापून फेकल्याची घटना घडली होती़ यानंतर लागलीच दुसरी घटना घडल्याने शेतक:यांमध्ये खळबळ उडून चर्चा सुरु झाली आह़े शेतक:याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याच्या या प्रकाराने शेतक:यांना धक्का बसला आह़े रविवारी झाडांमध्ये कल्टीव्हेटर मारुन घेत सोमवारपासून इतर कामांना शेतकरी चौधरी सुरुवात करणार होत़े

Web Title: The papaya plants were harvested by Mathefiru in a tapeworm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.