सोनवल परिसरातील शेतीच्या नुकसानीची पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:49 IST2019-08-16T12:49:20+5:302019-08-16T12:49:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील सोनवल तर्फे बोरद येथे अतीवृष्टी आणि गावाजवळील नाल्यांना आलेल्या पुरात घर आणि शेतीचे ...

सोनवल परिसरातील शेतीच्या नुकसानीची पंचनामे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील सोनवल तर्फे बोरद येथे अतीवृष्टी आणि गावाजवळील नाल्यांना आलेल्या पुरात घर आणि शेतीचे नुकसान झाले होत़े याठिकाणी पंचनाम्यांची मागणी करण्यात येत होत़े यानुसार बुधवारी सकाळी नुकसानीचे पंचनामे करण्यात आल़े
सोनवद येथे 5 ऑगस्टपासून भिषण पूरस्थिती निर्माण झाली होती़ यातून अनेकांच्या शेतातील पिक पूर्णपणे नष्ट होऊन शेतजमिनही खरडली गेली होती़ सोनवल परिसरात साधारण 569 हेक्टर जमिनीवर यंदा पेरण्यात करण्यात आली होती़ यात 485 हेक्टर क्षेत्रात कापूस, 25 हेक्टर सोयाबीन आणि 5 हेक्टर क्षेत्रात मिरची लागवड करण्यात आली होती़ या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याची स्थिती असून प्रशासनाकडून पंचनामे सुरु होत़े तलाठी आऱएऩदेसले, कृषी सहायक धनराज निकुंभे यांच्याकडून हे पंचनामे करण्यात आल़े यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शेतकरी उपस्थित होत़े बुधवारी सायंकाळर्पयत पंचनामे सुरु होत़े शेतशिवारातील पंचनाम्यांची भरपाई तातडीने देण्याची अपेक्षा उपस्थित शेतक:यांकडून व्यक्त करण्यात आली़
सोनवद गाव परिसरातून तीन नाले वाहतात़ या नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे शेतशिवाराची भिषण स्थिती झाली होती़ या भागातील अनेक शेतक:यांनी पिकविमा योजनेत सहभाग नोंदवला आह़े यामुळे त्यांना संबधित विमा प्रतिनिधींनी भेटी देऊन पाहणी करण्याची मागणी शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
शहादा तालुक्यातील वैजाली, काथर्दा, सोनवल, वाघोदा, परिवर्धे, वाघोदा, या भागात अतीवृष्टीमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात शेतपिकांसह शेतजमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने शेतक:यांना कोटय़ावधी रुपयांचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आह़े