नंदुरबारला सुरू होणार आॅक्सिजन प्लांन्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 12:40 IST2020-09-11T12:39:49+5:302020-09-11T12:40:44+5:30
रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचे वाढते संकट आणि सातत्याने निर्माण होणारा आॅक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता ...

नंदुरबारला सुरू होणार आॅक्सिजन प्लांन्ट
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाचे वाढते संकट आणि सातत्याने निर्माण होणारा आॅक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता आता नंदुरबार जिल्ह्याने स्वतंत्र आॅक्सिजन प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या कामालाही सुरुवात झाली असून पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रत्यक्षात आॅक्सिजनचा पुरवठा सुरू होणे अपेक्षीत आहे.
देशात सध्या कोरोनाबाबत २५ जिल्हे अतिसंवेदनशील मानले जात असून या जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्टÑातील नाशिक, धुळे व जळगावचा समावेश आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी आॅक्सिजनचा तुटवडा जानवत आहे. त्याचा परिणाम कोरोना रुग्णांच्या उपचारावर होत असून अनेक रुग्णांच्या नातेवाईकांकडून आॅक्सिजन न मिळाल्याने रुग्णाच्या मृत्यू झाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील चित्रही दिवसेदिवस गंभीर होत आहे. गेल्या १५ दिवसात रुग्ण वाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटना व इतर आरोग्य संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील महिन्यात हे चित्र अजूनही गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभुमीवर नंदुरबार जिल्ह्यात रुग्णांची हेळसांड होऊ नये व त्यांना पुर्ण सुविधा देता याव्यात यासाठी प्रशासनाचेही प्रयत्न सुरू झाले आहेत.
गेल्या महिन्यातच कोविड तपासणीसाठी स्वतंत्र आधुनिक लॅब सुरू झाली आहे. आता संभाव्य आॅक्सिजनचे संकट पहाता त्याच्या तयारीसाठी प्रशासन आतापासूनच कामाला लागले आहे.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्यासाठी आॅक्सिजन प्लान्ट उभारण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या प्लान्टवर साधारणत: दोन कोटी रुपये खर्च अपेक्षीत आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णलय दरवर्षी ४० लाख रुपये खर्च करणार आहे. या प्लान्टचा उभारणीसाठी मुंबईच्या कंपनीने टेडर देण्यात आले असून त्याच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली आहे. साधारणत: २० ते २५ दिवसाचा कालावधीत तो पुर्ण होणे अपेक्षीत असल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात सध्या आॅक्सिजनचे १०७ बेड आहेत. त्यावर सद्यस्थितीत ५२ रुग्ण उपचार घेत आहेत. इतर बेड सद्या रिकामे असले तरी येत्या काही दिवसात ते वाढणार असल्याचा वैद्यकीय सूत्राचा अनुमान आहे. रोज जिल्ह्याला ६० ते ७० आॅक्सिजन सिलिंडर लागतात. हे सिलिंडर धुळ्याहून मागविले जात आहेत. त्यासाठी लागणारा खर्च व वाहतुकीचा खर्च आणि वेळ या साºयाच बाबी आपत्कालीन परिस्थितीत न परवडणाºया आहेत.
ही बाब लक्षात घेऊन जिल्हा आॅक्सिजन बाबत स्वयंपूर्ण करण्यासाठी हा प्लान्ट उभारला जात आहे. याद्वारे रोज सुमारे दिडशे सिलिंडरचे उत्पादन होणार असून जिल्ह्यातील रुग्णांसाठी ते महत्वाचे ठरणार आहे.
सद्याची परिस्थिती पहाता येत्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात रुग्ण नियंत्रणात असले तरी भविष्यात गरज भासल्यास रुग्णांना सर्व सुविधा देता याव्यात यासाठी ही उपाययोजना जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने प्रशासन करीत आहे. हा प्रकल्प झाल्यास आॅक्सिजन मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातच उपलब्ध होणार आहे.
-डॉ.आर.डी.भोये,
जिल्हा शल्य चिकित्सक, नंदुरबार.