शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

अचानक वातावरणात बदलामुळे अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागल्याने बळीराजा चिंतेत दिसून येत आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच ...

अचानक वातावरणात बदलामुळे अवकाळी पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागल्याने बळीराजा चिंतेत दिसून येत आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आलेले आहे. तर सप्टेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेंबर, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनेही खरीप पिके पूर्णपणे वाया गेली,त् यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याच्या धास्तीने शेतकरीवर्ग चिंतेत पडला आहे. रब्बी हंगामासाठी विहिरींमध्ये पाणी आहे, पण रब्बीतील गहू आणि हरभरावाढीसाठी पूरक वातावरणाची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे याचा विपरित परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. रब्बीच्या ऐन हंगामात पावसाचे वातावरण तयार होत असून त्यामुळे भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान होणार आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होत आहे, त्यामुळे उत्पादनवाढीस खीळ बसते. पावसाळी वातावरण आणि ढग कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. कांदा पिकांवरील कीडनाशकांची फवारणी करीत पिके वाचवण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे आणि हेच ढगाळ वातावरण अजून चार ते पाच दिवस राहण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांना जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

सप्टेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेंबर, ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीनेही खरीप पिके पूर्णपणे वाया गेली. त्यामुळे नव्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेतली. मात्र, सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पिके वाया जाण्याच्या धास्तीने शेतकरीवर्ग चिंतेत दिसून येत आहे. रब्बीच्या ऐन हंगामात पावसाचे वातावरण तयार होत असून त्यामुळे कांदा पिकांचे व भाजीपाला नुकसान होत आहे. वातावरणातील गारवा वाढल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढीस वाव मिळत असल्याने त्यामुळे उत्पादनवाढीस खीळ बसताना दिसून येत आहे. ढगाळ वातावरण कायम राहिले तर खरिपाप्रमाणेच रब्बीचे नुकसान होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करू लागले आहेत.