शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रादुर्भाव :दिवाळी सुट्टीचा परिणाम जाणवण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:28 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दुसरी लाट नसली तरी दिवाळीच्या ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. दुसरी लाट नसली तरी दिवाळीच्या कालावधीत गर्दीत सहभागी होणे, गावाला जाणे यासह शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षकांचे स्वॅब घेतल्याने चाचण्या वाढल्यामुळे बाधितांचा आकडा वाढल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी सजग राहून कोरोनाचे नियम पाळावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.   ॲाक्टोबरचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याचा पुर्ण महिना या काळात कोरोना बाधीतांची संख्या कमालीची रोडावली होती. दीड महिन्यात केवळ ३००रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु आता कोरोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. दररोज किमान ३० ते ६० रुग्ण आढळून येत आहे. याला कारण वाढलेल्या चाचण्या आणि बाधितांच्या संपर्कातील लोकांची तपासणी हे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणने आहे. कारण काहीही असले तरी कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी प्रशासनासह नागरिकांनीही सजग राहून संख्या वाढणार नाही याची काळजी घ्यावी असे अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दुसरी लाट नाहीजिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असले तरी दुसरी लाट म्हणता येणार नाही असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु दक्षता घ्यावी असेही आवाहन करण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि व्यवस्था प्रशासनाने करून ठेवली होती. परंतु सुदैवाने जिल्ह्यात किंवा राज्यात ही लाट आली नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. रुग्णांचे वाढते प्रमाणजिल्ह्यात दररोज ३० ते ६० कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत आहेत. दिवाळीच्या काळात खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे कुठलेही पालन केले नाही. शिवाय दिवाळीनिमित्त बाहेर गावी जाण्याचे प्रमाण, पर्यटनस्थळी जाण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे रुग्ण संख्या वाढली असल्याचे बोलले जात आहे. शिवाय २३ नोव्हेंबरपासून लागलीच शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरु करतांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आश्रमशाळांसह माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मिळून जवळपास सहा हजारापेक्षा अधीक जणांची कोरोना चाचणी करण्यात आल्याने ही संख्या वाढल्याचा अंदाजही आहे. साखळी तोडण्यासाठी प्रयत्नकोरोना बाधीतांची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे अर्थात कॅान्टॅक्ट ट्रेसींगवर भर दिला जात आहे. अशा व्यक्तींचे स्वॅब संकलन केले जात असून त्यांना क्वाॉरंटाईनही करण्यात येत आहे. सद्या अनेकजण होम क्वॅारंटाईनला पसंती देत असल्यामुळे क्वॅारंटाईन सेंटर बंद पडली आहेत. केवळ कोरोना उपचार कक्ष सुरू आहेत. नियमांचे पालन करावेजिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करावे. सद्या लग्न समारंभ    आणि सार्वजिनक कार्यक्रमांना परवाणगी देण्यात आली     असल्यामुळे अशा ठिकाणी गर्दी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला असल्याचे दिसून येत आहे. लग्न किंवा सार्वजनिक समारभांमध्ये सहभागी होतांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क लावणे, वारंवार सॅनिटाझरचा वापर करणे आदी नियम पाळणे आवश्यक आहे. याशिवाय अशा कार्यक्रमांमध्ये लहान मुले व वृद्धांना नेण्याचे टाळणे हिताचे ठरणार आहे. 

लग्न समारंभ ठरताय धोक्याची ठिकाणे... n लग्न समारंभ सद्या कोरोनाचे हॅाटस्पॅाट ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी जातांना आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे. आयोजकांनी देखील आवश्यक त्या उपाययोजना करूनच पाहुणे मंडळींना बोलवावे अशा सुचना यापूर्वीच देण्यात आलेल्या आहेत. n स्वॅब संकलन सद्या नंदुरबार व शहादा येथे करण्यात येत आहे. शिक्षक व शिक्षकेतरांचे स्वॅब घेण्यासाठी तालुकास्तरावर सोय करण्यात आली होती. आता ती बंद असल्याचे सांगण्यात आले. स्वॅब तपासणीसाठी आरटीपीसीआर आणि रॅपीड ॲण्टीजण या दोन्ही प्रकारच्या चाचण्या सुरू आहेत.