एस.टी.प्रवर्गात धनगर समाजाच्या समावेशाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 13:01 IST2018-11-29T13:01:18+5:302018-11-29T13:01:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी महासंघाने केली आहे. ...

एस.टी.प्रवर्गात धनगर समाजाच्या समावेशाला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये अशी मागणी आदिवासी महासंघाने केली आहे. तसे झाल्यास आदिवासी समाजाचा तीव्र विरोध राहणार असून मोठे आंदोलन देखील उभारले जाणार असल्याचे महासंघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिका:यांच्या माध्यमातून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धनगर, धनगड हे दोन्ही शब्द अनुसीचित जमातीच्या सुचित नाहीत. धनगड ही जमातच नाही. महाराष्ट्राच्या सुचीत धनगड असे भाषांतर केले जात आहे ते धांगड असे हवे. अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर ओरॉन जमात आहे. तिची पोटजात धांगड आहे. महाराष्ट्रात ओरॉन धांगड नाही. पण सुचीत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
2005 साली विधान परिषद सभापतींनी बैठक घेतली. त्यावेळी संशोधन पथक तयार केले गेले. त्यांनीही धांगड या जातीचा उल्लेख केला आहे. इतर राज्यात या जातील अनुसूचित जमातीच्या यादीत स्थान आहे. याचा अर्थ धांगड म्हणजे धनगर नाही असाही दावा महासंघाने दिलेल्या निवेदनात केला आहे.
धनगर ही जात असून जमात नाही असे नमुद करून निवेदनात म्हटले आहे की, धनगर आदिवासी नाहीत याचे अनेक ऐतिहासिक पुरावे या निवेदनात देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची धनगर समाजाची शिफारस करू नये. कारण राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक 36 वर ओरॉन, धांगड आहे. ते धनगड किंवा धनगर नाही अन्यथा शासनाविरोधात आदिवासींचा संघर्ष मोठय़ा प्रमाणावर उभा करण्यात येईल असेही या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
निवेदनावर आदिवासी महासंघाचे अध्यक्ष डॉ.भरत वळवी, महासचिव बटेसिंग वसावे, पावरा, बारेला मंडळाचे अध्यक्ष नामदेव पटले, आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष वाहरू सोनवणे, पावरा समाज संघटनेचे सरदार पावरा यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिका:यांच्या सह्या आहेत.