शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

एकेरी मार्ग व समविषम पार्र्कींग करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराची वाहतूक समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी एकरी मार्ग वाहतूक व समविषम पार्र्कींगची अंमलबजावणी करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराची वाहतूक समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी एकरी मार्ग वाहतूक व समविषम पार्र्कींगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिवाय ज्या भागात अतिक्रमण असेल ते काढण्यासाठी पालिकेकडे पत्र देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले.शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधिक्षक कार्यालयात बैठक घेण्यात आली. प्रवासी संघटना, प्रादेशिक परिवहन, नगरपालिका, टॅक्सी चालक-मालक संघटना, व्यापारी असोसिएशन अशा विविध संघटनांची बैठक बोलावून शहराच्या वाहतुकीचा मार्ग कसा मोकळा या होईल या संदर्भात चर्चा करण्यात आली.शहरातील वाहतूक नियम, एकेरी मार्ग, सम-विषम पार्कींग, लक्झरी बसेसचा थांबा, अ‍ॅपेरिक्षा, टॅक्सी यांचा थांबा निश्चित करणे, प्रवासी वाहतूक करणारे वाहनांचे कागदपत्रे आदी नियमांवर चर्चा करण्यात आली. या संदर्भात प्रथम महाराष्ट्र व्यायाम शाळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा एकेरी मार्ग करण्या संदर्भात निर्णय झाला. तसेच द्वारकाधीश मंदिरापासून गुरुनानक कापड बाजार, जुनी बडोदा बँक व बटेसिंगभैय्या कॉम्पलेक्स ते शास्त्री मार्केट वन-वे करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार कार्यालय, स्टेशन रोड, जुने न्यायालय, अमृत चित्र मंदिर, अमर चित्र मंदिर या भागात सम-विषम पार्कींंग करणे, असे निर्णय घेण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक पंडीत यांनी सुचित केले की, तीन सिट वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. वेळप्रसंगी पाच ते दहा हजाराचा दंड होईल. मुलींची छेडखानी मुळीच खपवून घेतली जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील अतिक्रमण निघत आहे. तर शहराचेही अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु आहे.त्याचप्रमाणे वाहतुक शाखा व प्रवासी संघटना प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जावून वाहतूकीचे नियमांसंदर्भात प्रबोधन करणार आहे, पालकांना देखील या संदर्भात वाहतूक करणाºया रिक्षा, मुलांची सुरक्षा अशा विविध विषयांवर जनजागृती करणे, लॉरीधारकांचे अतिक्रमणावर नगरपालिकेने त्वरीत लक्ष घालावे, अशा सुचना केल्या.यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, वाहतुक पोलीस निरीक्षक श्रीरंग, प्रवासी संघटना अध्यक्ष गजेंद्र शिंपी, प्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव, नगरपालिकेचे इंजिनिअर गावीत, व्यापारी असोसिएशनचे सुनिल सोनार, टॅक्सी चालक-मालक संघटनेचे राजेंद्र चौधरी, प्रवासी संघटनेचे सदस्य राजवीर अहिरे, विजय राठोड, रिक्षा युनियनचे किरण गवळी, गुरुनानक कापड बाजार असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.