केवायसीच्या नावाखाली नंदुरबारात एकाची ४५ हजारात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:50 IST2019-12-29T12:50:10+5:302019-12-29T12:50:17+5:30

नंदुरबार : बँक खात्याचे केवायसी करावयाचे सांगून खात्याची संपुर्ण माहिती घेत नंदुबारातील एकाला आॅनलाईन ४५ हजारात गंडावल्याची घटना घडली. ...

One thousand cheats in Nandurbar under KYC's name | केवायसीच्या नावाखाली नंदुरबारात एकाची ४५ हजारात फसवणूक

केवायसीच्या नावाखाली नंदुरबारात एकाची ४५ हजारात फसवणूक

नंदुरबार : बँक खात्याचे केवायसी करावयाचे सांगून खात्याची संपुर्ण माहिती घेत नंदुबारातील एकाला आॅनलाईन ४५ हजारात गंडावल्याची घटना घडली. नंदुरबार शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबारातील देसाईपुरा भागात राहणारे कुणाल अतुल शाह यांना २७ रोजी दुपारी एका नंबरवरून कॉल आला. त्यांनी बँक खात्याचे केवायसी अपडेट करावयाचे असल्याचे सांगितले. त्यासाठी मोबाईलवर क्यूक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करायला लावून त्यात वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्या आधारावर कुणाल शाह यांच्या स्टेट बँकेच्या खात्यातून सहा हजार २३९ रुपये आणि आईच्या अ‍ॅक्सीस बँक खात्यातून ३९ हजार ५७६ रुपये आॅनलाईन काढून घेतले. दोन्ही खात्यातून पैसे काढले गेल्याचा मेसेज आल्यावर शाह यांना आपण फसविले गेल्याचे लक्षात आले. त्यांनी नंदुरबार शहर पोलिसात फिर्याद दिल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One thousand cheats in Nandurbar under KYC's name