कट मारण्याच्या वादातून एकास बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 12:39 IST2017-10-03T12:39:55+5:302017-10-03T12:39:55+5:30

 One person suffocated by the promise of a cut | कट मारण्याच्या वादातून एकास बेदम मारहाण

कट मारण्याच्या वादातून एकास बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रिक्षाला मोटरसायकलचा कट मारल्याच्या कारणावरून चौघांनी एकास बेदम मारहाण केली. मारहाणीत त्याच्याकडील चार हजार 300 रुपये रोख आणि चांदीची अंगठी  व चेन काढून घेतल्याची घटना नंदुरबारात घडली.
रज्जाकपार्क मध्ये राहणारे साजिद हुसेन महमंद हुसेन अन्सारी हे आपल्या रिक्षाने अव्वलगाझी दर्गाकडे जात होती. त्यावेळी त्यांना एकाने मोटरसायकलीचा कट मारला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसाने जमावाकडून मारहाणीत झाले. अज्ञात चार ते पाच जणांनी साजिद अन्सारी यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या खिशातील चार हजार 300 रुपये रोख काढून घेतले शिवाय गळ्यातील चेन आणि हातातील चांदीची अंगठी देखील काढून   घेतली.  
या घटनेमुळे मारुती व्यायाम शाळा परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक डी.के.बुधवंत, फौजदार भदाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. याबबत साजिद हुसेन महमद हुसेन अन्सारी यांनी फिर्याद दिल्याने    अज्ञात जमावाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title:  One person suffocated by the promise of a cut