पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून अक्कलकुवा तालुक्यात एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 12:46 IST2019-08-20T12:46:47+5:302019-08-20T12:46:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंडचा पाटीलपाडा येथे पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाचा खून झाल्याची घटना मार्च महिन्यात घडली ...

One murdered in Akkalkuwa taluka by money laundering | पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून अक्कलकुवा तालुक्यात एकाचा खून

पैश्यांच्या देवाण-घेवाणीतून अक्कलकुवा तालुक्यात एकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील बेडाकुंडचा पाटीलपाडा येथे पैशांच्या देवाणघेवाणीतून एकाचा खून झाल्याची घटना मार्च महिन्यात घडली होती़ याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
बेडाकुंडचा पाटीलपाडा येथील विजय खाल्या तडवी (35) यांचा पैश्यांवरुन गावातच राहणा:या दादला इरमा तडवी याच्यासोबत वाद होता़ यातून 23 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यास दादला इरमा तडवी, भिमसिंग वनसिंग तडवी, काल्या सोन्या तडवी, पुल्या सोन्या तडवी, पांडुरंग आदशी वळवी यांच्यासह दोघांनी बेदम मारहाण केली होती़ मारहाणीत विजय तडवी याचा मृत्यू झाल्यानंतर संशयितांनी त्यास एमएच 39-5285 या वाहनातून बेडाकुंड ते साकलीउमर दरम्यान रस्त्यावर फेकून देत अपघाताचा बनाव केला होता़ 
मयताच्या कुटूंबियांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी उपचाराच्या आशेने नंदुरबार येथे दाखल केले होत़े परंतू त्यास मयत घोषित करण्यात आले होत़े याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन कागदपत्रे देत मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला होता़ दरम्यान मयत विजय तडवी यांची पत्नी लोकीबाई यांनी अक्कलकुवा न्यायालयात अर्ज दाखल करुन दाद मागितली होती़ न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करत मोलगी पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आदेश दिले होत़े त्यानुसार दादला तडवी, भिमसिंग तडवी, काल्या तडवी, पूल्या तडवी, पांडुरंग वळवी सर्व रा़ बेडाकुंडचा पाटीलपाडा व वाडीबार ता़ अक्कलकुवा येथील आणखी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 
तपास पोलीस निरीक्षक पी़सी़सोनवणे करत आहेत़ संशयितांचा पोलीसांकडून शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
 

Web Title: One murdered in Akkalkuwa taluka by money laundering