शहादा तालुक्यात दुचाकी अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 13:18 IST2021-01-22T13:18:51+5:302021-01-22T13:18:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा तालुक्यातील जावदे रस्त्यावर दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात ५१ वर्षीय पुरुष ठार ...

शहादा तालुक्यात दुचाकी अपघातात एक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तालुक्यातील जावदे रस्त्यावर दोन मोटारसायकली एकमेकांवर धडकून झालेल्या अपघातात ५१ वर्षीय पुरुष ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी अपघात घडवणाऱ्या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल आहे.
कोमलसिंग गुलाब गिरासे (वय ५१, रा. महावीरनगर, शहादा) असे मृताचे नाव आहे. कोमलसिंग गिरासे हे बुधवारी (एमएच ३९ एजी ६०६८) या दुचाकीने जावदे येथे जात असताना शहादा ते कलसाडी रस्त्यावर समाेरुन भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत कोमलसिंग गिरासे यांना गंभीर मार लागून दुखापत झाली होती. यातून त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला.
याबाबत योगेश प्रेमसिंग गिरासे यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात मोटारसायलस्वाराविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सादिक सय्यद करत आहेत.