नवापुरात ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:58 IST2020-01-01T12:58:42+5:302020-01-01T12:58:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : राष्ट्रीय महामार्गावरील येथील जुन्या सीमा तपासणी नाक्याजवळ मेमन आॅटोसमोर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. ...

नवापुरात ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : राष्ट्रीय महामार्गावरील येथील जुन्या सीमा तपासणी नाक्याजवळ मेमन आॅटोसमोर मंगळवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. त्यात एक ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही भावंडं आखातवाडा, ता.मालेगाव येथून दशक्रिया विधी आटोपून घरी बारडोली येथे जात असताना हा अपघात झाला.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नवापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मेमन आॅटो शोरूमसमोर ट्रक (क्रमांक एम.एच. १८ बीए- ८४०४) व दुचाकी (क्रमांक जी.जे. १९ जेपी- ९११४) यांची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. दुचाकीवर असलेले गुजरात राज्यातील बारडोली येथील रहिवासी ज्ञानेश्वर ताराचंद खैरनार (४६) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा लहान भाऊ गोकूळ ताराचंद खैरनार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात नवापूर येथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ.राहुल सोनवणे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बारडोली येथे रवाना केले. नवापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.