लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : भरधाव मालवाहू मिनी टेम्पोने धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाल्याची घटना शहादा-खेतिया रस्त्यावर घडली.प्रकाश विठ्ठल शिंदे (५३) रा.खेतिया असे मयताचे नाव आहे. खेतियाकडून भरधाव येणाऱ्या मालवाहू मिनी टेम्पोने प्रकाश शिंदे यांना जबर धडक दिली. त्यात ते रस्त्याच्या बाजुला फेकले जावून त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कमलेश प्रकाश शिंदे यांनी फिर्याद दिल्याने म्हसावद पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}