श्रावणी येथे शेतातील घरात दगडाने ठेचून एकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:11 IST2020-02-25T14:11:34+5:302020-02-25T14:11:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी/खांडबारा : शेतातील घरात एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना श्रावणी, ता.नवापूर शिवारात घडली. सोमवारी दुपारी ...

One killed in stone crushing at a farm house in Shravani | श्रावणी येथे शेतातील घरात दगडाने ठेचून एकाचा खून

श्रावणी येथे शेतातील घरात दगडाने ठेचून एकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी/खांडबारा : शेतातील घरात एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना श्रावणी, ता.नवापूर शिवारात घडली. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोपी व खुनाचे कारण अज्ञात असून विसरवाडी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रानुसार, नवापूर तालुक्यातील खांडबारा येथील रहिवासी भटूलाल काशिनाथ परदेशी (५०, रा.खांडबारा) यांची श्रावणी शिवारात शेती आहे. या शेतात त्यांनी घर बांधले असून शेताची रखवाली करण्यासाठी ते त्याठिकाणी रात्री मुक्कामी राहत होते. त्यांच्या मुलीला विवाहासाठी पाहण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी एक स्थळ येणार होते. त्यासाठी यांचा मुलगा मिलिंदकुमार भटूलाल परदेशी हे त्यांच्या वडिलांना बोलावण्यासाठी शेतात गेले असता त्यांचे वडील भटूलाल काशिनाथ परदेशी हे रक्तबंबाळ अवस्थेत तेथे मृत अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, अज्ञात कारणासाठी त्यांना दगडाने डोक्यात व तोंडावर ठेचून त्यांचा खून केल्याचे निदर्शनास आले.
घटनास्थळी खाटेवर, गादीवर, भिंतीवर व जमिनीवर रक्ताचा सडा पडलेला होता. रक्ताने माखलेला दगडदेखील तेथे पडले होता.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात मिलिंदकुमार भटूलाल परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलीक निरीक्षक गणेश न्हायदे हे करीत आहेत.

Web Title: One killed in stone crushing at a farm house in Shravani