कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 22:01 IST2019-08-23T22:00:54+5:302019-08-23T22:01:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा-दोंडाईचा रस्त्यावर बुधवारी रात्री सावळदा फाटय़ाजवळ हरीयाली इस्टेटसमोर झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात ...

कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहादा-दोंडाईचा रस्त्यावर बुधवारी रात्री सावळदा फाटय़ाजवळ हरीयाली इस्टेटसमोर झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गणेश गोरख पवार (42) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एका जखमीवर उपचार सुरू आहेत.
शहादा शहरातील परेश पवार यांचे लहान भाऊ गणेश पवार हे त्यांच्या मित्रासोबत दुचाकीने दोंडाईचा येथून शहाद्याकडे बुधवारी रात्री येत होते. त्याचवेळी शहादाकडून दोंडाईचाकडे जाणारी कार (एम.एच.06 एङोड- 9240) जात होती. कार व दुचाकीत समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार गणेश पवार हे कारच्या काचेवर जाऊन पडला तर त्यांच्यासोबत असलेले रवींद्र हरी ठाकरे (36) हे 10 ते 15 फूट अंतरावर फेकले गेले. या रस्त्यावरून येणा:या-जाणा:यांनी दोघांना शहादा रुग्णालयात दाखल केले होते. त्यात गणेश पवार यांचा खाजगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला तर रवींद्र ठाकरे यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियदर्शिनी थोरात करीत आहेत.
दरम्यान, गणेश पवार यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, पालिकेतील काँग्रेसचे गटनेते प्राचार्य मकरंद पाटील, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, नगरसेवक व विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी झाले होते.