नेसू नदीच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:22 IST2019-09-23T12:22:14+5:302019-09-23T12:22:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील देवमोगरा गावाच्या पुलाजवळ नेसू नदीच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला़ रविवारी ...

One dies after crossing river Nesu | नेसू नदीच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू

नेसू नदीच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवापुर तालुक्यातील देवमोगरा गावाच्या पुलाजवळ नेसू नदीच्या पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला़ रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ 
तुकाराम रामजी गावीत रा़ शेही ता़ नवापुर (44) असे मयताचे नाव असून ते रविवारी दुपारी देवमोगरा गावाजवळील नेसू नदीच्या पुलाखाली अंघोळ करण्यासाठी गेले होत़े यावेळी नेसू पुराच्या पाण्यात अचानक वाढ झाल्याने त्यात तुकाराम गावीत हे वाहून गेल़े घटनास्थळी त्यांना योग्य ती मदत मिळू न शकल्याने त्यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला़ 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी घटनास्थळी भेट दिली़ याबाबत दिलीप तुकाराम गावीत यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आह़े तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावीत करत आहेत़ शवविच्छेदन करुन मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला़ 
 

Web Title: One dies after crossing river Nesu