शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिवभोजन थाळीला एक कोटीचा आस्वाद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:13 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेमुळे कोरोना संकटाच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अल्पदरात भोजन ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेमुळे कोरोना संकटाच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अल्पदरात भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील १३ शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन लाखापेक्षा अधिक थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यासाठी  एक कोटी आठ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त शहरात येत असतात. अशावेळी त्यांना भोजनासाठी अधिक खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी १ जानेवारी २०२० पासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. दोन चपात्या, एक भाजी आणि वरण-भात समाविष्ट असलेल्या थाळीचा दर शहरी भागासाठी ५० रुपये आणि ग्रामीण भागासाठी ३५ रुपये निश्चित करण्यात आला. सुरूवातीला १० रुपये प्रती थाळी याप्रमाणे भोजन वितरीत करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. शिवभोजन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शिवभोजन थाळीचे वितरण करणे बंधनकारक आहे. सुरूवातीला जिल्हा मुख्यालयी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा विस्तार तालुकास्तरापर्यंत करण्यात आला आहे.कोरोना संकटाच्या काळात उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने अनेकांचे रोजगार गेले. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्यासाठी एप्रिल महिन्यापासून शासनाने थाळीची किंमत पाच रुपयापर्यंत कमी केली. थाळीची उर्वरीत रक्कम शासनातर्फे अनुदान देण्यात येत असल्याने अत्यंत कमी दरात नागरिकांना शिवभोजन केंद्रातून भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात १० रुपये दराने १६ हजार ४९७ आणि पाच रुपये दराने तीन लाख ४१हजार थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. एका थाळीमागे शासनातर्फे ४० रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील १३ केंद्राद्वारे दररोज दीड हजार थाळ्यांचे वितरण करता येते. शासनातर्फे आतापर्यंत एक कोटी आठ लाख रुपये अनुदान देण्यात आले आहे. अत्यंत कमी दरात भोजनाची सुविधा झाल्याने नागरिकही या सुविधेचा लाभ घेताना समाधान व्यक्त करीत आहेत. विशेषत: कोरोना    काळात ही योजना अधिक उपयुक्त ठरली आहे. राज्यात एकूण ९०७ शिवभोजन केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत दोन कोटी ५३ लाखापेक्षा अधिक नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला आहे.