स्थानिक विकास निधीचे एक कोटी सहायता निधीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 11:56 IST2020-04-02T11:56:09+5:302020-04-02T11:56:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना नियंत्रण व उपाययोजनांसाठी सहायता निधीत खासदार डॉ.हिना गावीत यांनी आपल्या खासदार निधितील एक ...

One crore of local development funds into aid funds | स्थानिक विकास निधीचे एक कोटी सहायता निधीत

स्थानिक विकास निधीचे एक कोटी सहायता निधीत

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना नियंत्रण व उपाययोजनांसाठी सहायता निधीत खासदार डॉ.हिना गावीत यांनी आपल्या खासदार निधितील एक कोटी आणि एक महिनाच्या वेतनाचे एक लाख रुपयांचा पत्र व धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
कोरोना नियंत्रण व उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींना पंतप्रधान व मुख्यमंत्री सहायता निधीत योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार खासदार डॉ.हिना गावीत यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये या सहाय्यता निधीत जमा करावे असे पत्र जिल्हाधिकारी यांना दिले आहे. याशिवाय त्यांचे एक महिन्याचे वेतनाचे एक लाख रुपये देखील त्यांनी या सहाय्यता निधीत जमा केले आहे.
दोन्ही रक्कमेचे पत्र व धनादेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्याकडे जमा केले. यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत उपस्थित होते.

Web Title: One crore of local development funds into aid funds