शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे घर घेण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:31 IST2019-02-13T11:31:08+5:302019-02-13T11:31:59+5:30

नंदुरबार : तोरखेडा ता़ शहादा येथे घर विक्रीचा सौैदा करुन दोन लाखात एकाची फसवणूक केल्याची घटना घडली़ २०१२ पासून ...

One cheated by the excuse of taking house at Torkheda in Shahada taluka | शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे घर घेण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

शहादा तालुक्यातील तोरखेडा येथे घर घेण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

नंदुरबार : तोरखेडा ता़ शहादा येथे घर विक्रीचा सौैदा करुन दोन लाखात एकाची फसवणूक केल्याची घटना घडली़ २०१२ पासून पैसे देऊन खरेदी करण्यात आलेले नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला़
नाशिक येथील रमेश हनुमंत गरुड यांनी तोरखेडा गावातील घर क्रमांक ४३९ हे खरेदी करण्यासाठी दत्तकुमार कृष्णदास शहा यांच्यासोबत सौदा करुन त्यापोटी २ लाख रुपये दिले होते़ यानंतर शहा याच्याकडून घर नावावर करुन देण्याची अट होती़ परंतू फेब्रुवारी २०१२ पासून हा व्यवहार होऊनही शहा याच्याकडून गरुड यांच्यानावे घर करुन दिले जात नव्हते़ यातून फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश गरुड यांनी सोमवारी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत दत्तकुमार शहा याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़
तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक बागुल करत आहेत़

Web Title: One cheated by the excuse of taking house at Torkheda in Shahada taluka