आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 19:03 IST2018-09-11T19:03:02+5:302018-09-11T19:03:14+5:30
धडगाव तालुक्यात घटना

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
नंदुरबार : कात्रीचा कारभारीपाडा ता़ धडगाव येथे विवाहितेचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ धडगाव पोलीसांनी केलेल्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली़
अनिताबाई दिल्या पावरा (२३) या विवाहितेने ७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते़ याबाबत धडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़ दरम्यान पोलीसांनी केलेल्या तपासानुसार पती दिला भादला पावरा याच्यासह सिंगा मात्या भिल रा़ शिदवाणी ता़ धडगाव व गोट्या सायसिंग भिल या दोघांनी वेळोवेळी शारिरिक मानसिक छळ केल्याचे स्पष्ट झाले होते़ यातून त्रास सहन न झाल्याने अनिताबाई हिने आत्आत्महत्या केली होती़
याबाबत माठ्या मिठ्या पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल असून तपास सहायक पोेलीस निरीक्षक एस़सी़मोरे करत आहेत़