शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरातील रूग्णांची संख्या १७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर हळू हळू बंदिस्त होत चालले आहे. शेफाली पार्क भागातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर हळू हळू बंदिस्त होत चालले आहे. शेफाली पार्क भागातील ४२ वर्षीय पुरूष व अवधुतवाडी येथील ५८ वर्षीय पुरूष अशा दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्याची रूग्ण संख्या १७ वर पोहोचली आहे. मुसलमान मोहोल्ला येथील २९ वर्षीय महिला कोरोना संसर्गमुक्त झाल्याच्या सुखद बातमीने शहरास दिलासा मिळाला आहे.
सोमवारी रात्री उशिरा शेफाली पार्क भागातील ४२ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे वृत्त शहरात पसरले. प्रशासनाने तातडीने कारवाई हाती घेत औषध फवारणी, संपर्कातील लोकांना विलगीकरण कक्षात दाखल करणे, परिसर सील करणे या सारख्या कृती रात्री उशिरातून पूर्ण केल्या. मंगळवारी दुपारी पुन्हा अवधुतवाडी येथील ५८ वर्षीय पुरूषाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह झाल्याचे समजताच प्रशासनाची टीम तातडीने तेथे दाखल झाली. शीतल सोसायटीचा एक भाग आधीच सील असल्याने प्रशासनाला येथे संपर्कातील लोकांचे विलगीकरण वगळता नव्याने काही जास्त कृती करावी लागली नाही.
तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन, पुरवठा अधिकारी मिलिंद निकम, पालिकेचे अधीक्षक मिलींद भामरे, कक्ष अधिकारी अनिल सोनार यांनी शेफाली पार्क व अवधुत वाडी भागात उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली.
नागरिकांना कंटेनमेंट झोनचे पालन करण्याची त्यांनी समज दिली. शहरासाठी मंगळवारी समाधान देणारी बातमीही मिळाली. मुसलमान मोहोल्ला येथील २९ वर्षीय महिला कोरोना संसर्गमुक्त झाली. व्यारा येथील उपचारानंतर महिला स्वगृही परतली.
शहरात तीन दिवसात कोरोना रूग्णांची संख्या सात झाली आहे तर एकूण संख्या १० झाली आहे. एखाद्या रूग्णास कोरोना संसर्ग झाल्याबरोबर प्रशासनाला करावयाच्या उपाय योजनांमध्ये परिसर सील करणे व कंटेनमेंट झोन जाहीर करणे ही बाब सर्वप्रथम अंमलात येते. हे पाहता मंगलदास पार्क, जनता पार्क, मुसलमान मोहोल्ला, शेफाली पार्क, जुनी महादेव गल्ली, सरदार चौक, शीतल सोसायटी, अवधुत वाडी, राजीव नगर, इंदिरानगर, नारायणपूर रोड हा परिसर प्रशासनाकडून सील करण्यात आला. त्यात अलिकडे मंगलदास पार्क व जनता पार्क हा भाग वगळला गेला आहे. मात्र शहरात उर्वरीत भाग सील करून कंटेनमेंट झोनमध्ये बदलण्यात आला आहे. सील करण्यात येणाऱ्या भागाची व्याप्ती वाढत असून शहर हळूहळू बंदिस्त होत चालला आहे.
कोरोनाच्या संसर्गापासून स्वत:चा बचाव करा, बाहेरगावी जाणे टाळा, सोशियल डिस्टन्सिंगचे पालन करून सॅनिटायझर व मास्कचा महत्तम वापर करून शासनाकडून देण्यात येणाºया सूचनांचे पालन करा, असे आवाहन तहसीलदार सुनिता जºहाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शशिकांत वसावे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, बुधवारी नवापूर शहरात मात्र एकही रूग्ण न आढळल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.