आश्रमशाळा कर्मचाºयांचा असहकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 12:57 IST2020-10-10T12:57:20+5:302020-10-10T12:57:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना विविध शाळाबाह्य कामे दिली जात असल्याने त्यांना व त्यांचा परिवाराला ५० लाखांचे ...

आश्रमशाळा कर्मचाºयांचा असहकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आश्रमशाळा कर्मचाऱ्यांना विविध शाळाबाह्य कामे दिली जात असल्याने त्यांना व त्यांचा परिवाराला ५० लाखांचे विमा कवच उपलब्ध करावे अन्यथा १० आॅक्टोबरपासून बेमुदत असहकार आंदोलन करण्याचा इशारा सीआयटीयू संलग्नीत आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेने दिला आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांना संघटनेने निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना समुह संसर्गाच्या कालावधीत आदिवासी विभागातील संपुर्ण कर्मचारी सध्या खावटी अनुदान सर्वेक्षण, अनुसूचीत आदिम जमाती सर्व्हेक्षण, अनलॉक लर्निंग, पुस्तके वाटप अशा शाळाबाह्य कामांना सक्तीने जुंपले जात आहे. या कामांमध्ये कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोणतेही संरक्षण साहित्य तसेच विमा संरक्षण देण्यात आलेले नाही. या दरम्यान अनेकजण कोरोना रुग्ण झाले. काहींना जीव गमवावा लागला. सर्वच कर्मचाºयांना या कामात गुंतवले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
याशिवाय सातव्या वेतन आयोगाच्या आश्वासीत प्रगती योजनेचा पहिला, दुसरा, तिसरा लाभ देण्यात यावा. शिक्षण सेवकांना सातव्या वेतन आयोगाच्या वेतन प्रणालीनुसार वाढीव मानधन मिळावे.अनुदानीत आश्रमशाळेतील अंशदायी पेन्शनधारक कर्मचाºयांना डीसीपीएस कपातीचे हिशोबाची वर्षनिहाय सन २०१४ पासून पावती देण्यात यावी. इयत्ता दहावीच्या ६० टक्केपेक्षा कमी निकाल लागलेल्या विषय शिक्षकांचे कपात या सर्व मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून प्रकल्पातील सर्व कर्मचाºयांना न्याय मिळावा आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. यावेळी प्रकल्प अधिकाºयांशी इतरही विविध विषयांवर संघटनेतर्फे चर्चा करण्यात आली.
प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हा अधिकारी वसुमना पंत यांच्याशी चर्चा करतांना सहाय्यक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, काकडे, कार्यालयीन अधीक्षक बी. एफ. वसावे उपस्थित होते.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रा. पी. आर.पाटील, सचिव एस. एस. पाटील, सहसचिव प्रितम एस. वळवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष आशिष मुनघूटे, किशोर सोनवणे, सुनील सरवदे, व्ही. डी. पाटील उपस्थित होते.