कडवामहू फाटा येथे जीप-ट्रकच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:08 IST2018-07-23T13:08:05+5:302018-07-23T13:08:15+5:30

ओव्हरटेकच्या नादात जीप ट्रकवर धडकली

Nine passengers were injured in a Jeep-truck crash in Kadamahu Phata | कडवामहू फाटा येथे जीप-ट्रकच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी

कडवामहू फाटा येथे जीप-ट्रकच्या अपघातात नऊ प्रवासी जखमी

अक्कलकुवा : जीप व ट्रकची समोरासमोर धडक होऊन नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी अक्कलकुवा-खापर रस्त्यावर कडवामहू फाटय़ाजवळ घडली. 
राहुल्या रामा वळवी (40), नीला हादया राऊत (42), सत्या हादया राऊत (41), भीमा रामा वसावे (32), रतिलाल निंदा वसावे (25), रामा जीवा वसावे (45), वनिता रतिलाल वसावे (23), रामा धीमा वसावे (35), रमेश रामा वसावे (07) यांचा जखमींमध्ये समावेश आहे. सर्व प्रवासी गोरजापाडा ता.अक्कलकुवा येथील रहिवासी आहेत. अंकलेश्वर-ब:हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरील अक्कलकुवा ते खापर दरम्यान असलेल्या कडवामहु फाटया जवळ हा अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रय}ात महेंद्रा मॅक्स गाडीने (एमएच 39- 1962) समोरून येणा:या आयसर ट्रकला जोरदार धडक दिली. जखमींना ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा येथे व तेथून उपचारासाठी  जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्कलकुवा पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तपास  पोलिस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अनिस गावित करीत आहेत.
 

Web Title: Nine passengers were injured in a Jeep-truck crash in Kadamahu Phata