सव्वा नऊ लाखाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 12:15 PM2020-04-09T12:15:22+5:302020-04-09T12:15:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/नवापूर : महाराष्टÑातून गुजरातमध्ये विनापरवाना विक्रीसाठी जाणाऱ्या तीन ट्रकांमधून ९ लाख ३६ हजारांचा दारूसाठा स्थानिक गुन्हा ...

Nine lakh liquor seized in all | सव्वा नऊ लाखाची दारू जप्त

सव्वा नऊ लाखाची दारू जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार/नवापूर : महाराष्टÑातून गुजरातमध्ये विनापरवाना विक्रीसाठी जाणाऱ्या तीन ट्रकांमधून ९ लाख ३६ हजारांचा दारूसाठा स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोनजण फरार झाले. पोलिसांनी दारूसाठ्यासह एकुण २७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नवापूर तालुक्यातून गुजरामध्ये दारूसाठा जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी रात्री नवापूरनजीक सापळा लावला होता. रात्री अडीच वाजेच्या सुमारास खेकडा रस्त्यावरून ट्रक भरधाव जातांना दिसले. पथकाने बॅटरीच्या उजेडात त्यांना थांबण्याचा इशारा करूनही ते थांबले नाही. पाठलाग करून तिन्ही वाहनांना अडविले.
एका वाहनात अशोक लोटन मराठे, रा.महाराष्टÑ व्यायाम शाळेजवळ, नंदुरबार व अनिल मनोहर जवंजाळ, रा.शेफअली पार्क, नवापूर यांना ताब्यात घेवून विचारले असता त्यांनी ट्रकांमध्ये दारू असल्याचे सांगितले. त्यांनी वाहने ही मुन्ना गामीत, रा.व्यारा (गुजरात) यांची असल्याचे सांगितले. दारू गुजरातमधील खेड्यांमध्ये विक्रीसाठी जात असल्याचे सांगितले.
पथकाने वाहनांची तपासणी केली असता पहिल्या वाहनात (क्रमांक एमएच ३९-सी १८८३) ६ लाख ९१ हजार ६०० रुपये किंमतीची देशी दारू आढळून आली. दुसºया वाहनात (क्रमांक जीजे २५-ए २२७२) १ लाख ४८ हजार २०० रुपये किंमतीची दारू तर तिसºया वाहनात (क्रमांक जीजे १९ एएफ ७१६२) ९६ हजार २०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. एकुण दारू आणि तिन्ही वाहने मिळून २७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी अशोक लोटन मराठे व अनिल जवंजाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून फरार दोघांचा शोध सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार महेंद्र नगराळे, दादाभाऊ वाघ, शांतीलाल पाटील, जितेंद्र तोरवणे यांच्या पथकाने केली.

नवापूर व व्यारा येथील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी आता एलसीबीला मेहनत घ्यावी लागणार आहे. नवापूर तालुक्यातील दारू किंग कोण याचाही शोध घेणे आवश्यक आहे.

Web Title: Nine lakh liquor seized in all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.