शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नवीन वर्षाची सुरुवात शैक्षणिक दृष्टय़ा शुभशकुनाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:33 IST

-मनोज शेलार नवीन वर्षाची सुरुवात नंदुरबार जिल्हावासीयांच्या दृष्टीने शुभशकुनच म्हणावी लागेल. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात राज्य शासनाने नंदुरबारचे बहुप्रतिक्षीत ...

-मनोज शेलारनवीन वर्षाची सुरुवात नंदुरबार जिल्हावासीयांच्या दृष्टीने शुभशकुनच म्हणावी लागेल. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवडय़ात राज्य शासनाने नंदुरबारचे बहुप्रतिक्षीत वैद्यकीय महाविद्यालय मंजुर करून कार्यवाहीला सुरुवात केली. लगोलग दुस:या आठवडय़ात राज्य शासनाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अर्थात रुसा अंतर्गत मॉडेल डिग्री कॉलेज सुरु करण्याचा निर्णय घेतला. आधीच नंदुरबारात आंतरराष्ट्रीय शाळा सुरू झाली आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आदिवासी संस्कृती व संवर्धन केंद्र मंजुर आहे. कृषी महाविद्यालय सुरू झालेले आहे. आकांक्षीत जिल्ह्याअंतर्गत आणखी काही शैक्षणिक सुविधा नंदुरबारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक सुविधांसंदर्भात नंदुरबार आता विकसीत होऊ लागले असून हा वेग असाच कायम राहील अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.राज्यात व एकुणच देशात नंदुरबारची ओळख आदिवासी, मागास जिल्हा म्हणून आहे. एकत्रीत धुळे जिल्हा असतांना या भागाकडे नेहमीच दुर्लक्ष झाले. सर्वच बाबतीत नंदुरबार ‘मागासलेपण’ जपून होता. परंतु जिल्हानिर्मिती झाली आणि या भागाचे भाग्य उजळण्यास सुरुवात झाली. गेल्या 20 वर्षात नंदुरबारची प्रगती धिम्या गतीने का न होवो सुरू आहे. त्यातल्या त्यात शिक्षणाबाबतीत ब:यापैकी सुविधा उपलब्ध होऊ लागल्याने दुर्लक्षीत असलेला हा भाग आता मुख्य प्रवाहात आला आहे.नवीन वर्षात नंदुरबारकरांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने दोन मोठे निर्णय झाले. पहिला होता वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीचा. अनेक वर्षापासूनचे स्वप्न आता साकार होण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे. दुसरा निर्णय झाला तो मॉडेल कॉलेज मंजुरीचा. देशात 70 ठिकाणी आणि राज्यात केवळ दोनच ठिकाणी असे मॉडेल कॉलेज सुरू होणार आहेत. त्यात नंदुरबारचा समावेश आहे. राष्ट्रीय उच्चस्तर अभियानाअंतर्गत केंद्र शासनाने या महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. राज्य सरकारचा देखील यात खर्चाच्या दृष्टीने 40 टक्के वाटा राहणार असल्यामुळे राज्य मंत्रीमंडळाची देखील त्याला मंजुरी मिळणे आवश्यक होते. परवाच्या मंत्रीमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळाली आणि या महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झाला. मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह डिजीटल क्लासरूम, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि शैक्षणिक विभाग राहणार आहेत. पसंती आधारीत श्रेयांकन अभ्यासक्रम, मुलभूत आणि कौशल्याधारीत ऐच्छिक अभ्यासक्रम शिकवले जाणार आहेत. त्यामुळे नंदुरबारसारख्या भागातील विद्याथ्र्यासाठी ते मोठे सोयीचे ठरणार आहे. आता जिल्हा प्रशासनाने जागा उपलब्ध करून देवून या महाविद्यालयाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात कशी होईल या दृष्टीने प्रय}शील राहणे गरजेचे ठरणार आहे.नंदुरबारात यापूर्वीच राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. दोन वर्षापासून ही शाळा येथे सुरू आहे. याशिवाय कृषी महाविद्यालय चार वर्षापासून सुरू झालेले आहे. विद्यापीठाने आदिवासी संस्कृती संवर्धन व जतन केंद्राला मंजुरी दिलेली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जागाही उपलब्ध करून दिलेली असून त्याचे काम मात्र पुढे सरकू शकले नसल्याचे चित्र आहे. आदिवासी विकास विभागाची इंग्रजी माध्यमाची एकलव्य निवासी पब्लिक स्कूल देखील सुरू आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय दहा वर्षापासून सुरू आहे. केंद्र शासनाच्या योजनेतील आकांक्षीत जिल्हा म्हणून आणखी काही कौशल्याअधारीत शैक्षणिक सुविधा येथे येत्या काळात येथे मंजुर होण्याची शक्यता आहे.एकुणच गेल्या काही वर्षात शैक्षणिक हबच्या दृष्टीने नंदुरबार आगेकूच करीत आहे. परंतु शासनाने केवळ घोषणा करून, मंजुरी देवून न थांबता अशी कॉलेजेस्, शैक्षणिक सुविधा लागलीच कशा सुरु होतील याबाबतही तेवढेच प्रय} करणे गरजेचे आहे. तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय शाळा यामधील सोयी-सुविधा, मणुष्यबळ यांचा विचार करता ‘आलबेल’ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शैक्षणिक केंद्रांची मंजुरी देतांना त्यांचा दर्जा, गुणवत्ता आणि आवश्यक सोयी सुविधा पुढील कालावधीत सहज आणि मागणीप्रमाणे उपलब्ध होतील यादृष्टीनेही आधीच नियोजन करून ठेवणे सोयीचे ठरणार आहे.