आहार व कुपोषणवर नवसंजीवनी बैठकीत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 12:16 IST2019-11-22T12:16:52+5:302019-11-22T12:16:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक ...

आहार व कुपोषणवर नवसंजीवनी बैठकीत चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवसंजीवनी योजनेच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीस प्रकल्प अधिकारी अविश्यांत पंडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, अनिकेत पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, डॉ. कांतीलाल टाटीया, डॉ. राजेश वळवी, लतिका राजपूत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भारुड यावेळी म्हणाले, अमृत आहार योजनेबाबत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर माहिती देणारा फलक व त्यावर योजनेबाबत सर्व तपशील नमूद करावा. पावसाळ्यात संपर्क तुटणा:या गावांच्या रस्त्यांची कामे व नादुरुस्त रस्ते तातडीने दुरुस्त करुन घ्यावीत. ग्रामीण रुग्णालयातील औषध साठय़ाबाबत वेळोवेळी आढावा घेवून प्रत्येक रुग्णालयात पुरेशा औषधसाठा उपलब्ध राहील याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, सॅम, मॅम सिकलसेल तपासणी, 0 ते 6 वयोगटातील बालकांची तपासणी तसेच ग्रेड तीन व चारच्या बालकांना आंतररुग्ण सेवा देणे, पावळ्यात संपर्क तुटणा:या गावांच्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्यावश्यक, जीवनरक्षक व औषधसाठा, विशेष स्त्री रोग तज्ञ व बालरोग्य तज्ज्ञांची पदे, नवसंजीवनी योजनेअंतर्गत समाविष्ठ असणा:या गावांचे जोडरस्ते, विद्युतीकरण, पाणी पुरवठा तसेच धान्य पुरवठा या विषयी आढावा घेण्यात आला.
नवसंजीवनी योजनेअंतर्गत येणा:या गावांमध्ये पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना केल्या जातात. तरीही कुपोषण, पोषण आहार आणि गर्भवती महिलांसाठीच्या आहाराबाबत तक्रारींचा पाढा कायमच राहतो. त्याचाही आढावा या बैठकीत घेण्यात येवून उपाय योजना सुचविण्यात आल्या.