रुग्ण व नातेवाईकांची पायपीट थांबण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:27 AM2021-04-19T04:27:17+5:302021-04-19T04:27:17+5:30

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने सध्या शहादा तालुक्यात गंभीर रुप घेतले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. रुग्ण ...

The need for concrete measures to stop the pipeline of patients and relatives | रुग्ण व नातेवाईकांची पायपीट थांबण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

रुग्ण व नातेवाईकांची पायपीट थांबण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज

Next

कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेने सध्या शहादा तालुक्यात गंभीर रुप घेतले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. रुग्ण संख्या वाढल्याने आणि शासकीय यंत्रणा कमी पडू लागल्याने शहरात अचानक खासगी कोविड सेंटरची संख्या वाढली आहे. यापैकी काही रुग्णालयातून बेड, रेमडेसिविर, व्हेंटिलेटर, पी.पी.ई. किट यांच्या नावाखाली प्रचंड लूट सुरू झाली आहे. रुग्णांचे नातेवाईक पाण्यासारखा पैसा खर्च करून आपल्या माणसाचा जीव वाचावा म्हणून प्रयत्न करीत आहेत. खासगी कोविड सेंटरची संख्या वाढूनही रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट मात्र थांबलेली नाही. जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर डायरेक्ट कोविड सेंटरला पुरविले जातील असे जाहीर करूनही रुग्णांना कोविड सेंटरमध्ये रेमडेसिविर मिळत नसल्याने रेमडेसिविरसाठी पायपीट करावी लागत आहे. रुग्णाला रेमडेसिविर बाहेरून आणल्याशिवाय काही कोविड सेंटर रुग्णास दाखल करून घेत नाहीत. एकतर प्रशासनाकडून सेंटरला पुरेशा प्रमाणात रेमडेसिविर मिळत नाहीत किंवा सेंटरमध्येच त्याचा काळाबाजार होत असेल त्यामुळे प्रशासनाने रोज कोणत्या कोविड सेंटरला किती रेमडेसिविर पुरवले, किती रेमडेसिविर उपलब्ध आहेत याची माहिती रोजच्या रोज जाहीर केली पाहिजे.

त्याचप्रमाणे प्रत्येक कोविड सेंटरला एकूण व उपलब्ध बेड किती, एकूण व उपलब्ध व्हेंटिलेटर किती, उपलब्ध रेमडेसिविर किती याची माहिती देणारा फलक लावण्याची सक्ती केली पाहिजे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट थांबेलच पण त्याचबरोबर कोविड सेंटरमधील गैरप्रकारावरही आळा बसू शकेल. ही माहिती कोविड सेंटरकडून रोजच्यारोज सोशल मीडियावरूनही जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र अधिकारी नियुक्त केला पाहिजे.

तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये बेड, व्हेंटिलेटरची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

शहरातील सर्व कोविड सेंटरचे प्रमुख व तालुका वैद्यकीय अधिकारी किंवा अन्य आरोग्य अधिकारी यांचा व्हाॅट्स ॲप ग्रुप तयार करून प्रत्येक कोविड सेंटरने ग्रुपवर रोज सकाळी व संध्याकाळी आपापल्या कोविड सेंटरमधील उपलब्ध बेड, व्हेंटीलेटर, रेमडेसिविर आदी माहिती टाकली व ती माहिती शहरातील इतर ग्रुपवर शेअर केली तर रुग्णांची पायपीट नक्कीच थांबेल व रुग्णांना वेळेवर उपचार मिळून प्राण वाचविता येतील. फक्त गरज आहे ती प्रामाणिक प्रयत्नांची.

Web Title: The need for concrete measures to stop the pipeline of patients and relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.