नवापुरातील घरफोडीत 86 हजारांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 12:39 IST2018-03-25T12:39:33+5:302018-03-25T12:39:33+5:30

Nawapuri: The 86,000-strong house in Navapur | नवापुरातील घरफोडीत 86 हजारांचा मुद्देमाल लंपास

नवापुरातील घरफोडीत 86 हजारांचा मुद्देमाल लंपास

लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 25 : नवापुरातील मंगलदास पार्क भागातील घरफोडीत चोरटय़ांनी 86 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 
मंगलदास पार्कमध्ये राहणारे अॅड.राकेश भालचंद्र कोठावदे हे बाहेरगावी गेले होते. बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी घरातील कपाटातून 86 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात 15 हजार रुपये रोख, 42 हजार रुपयांचे सोन्याची रिंग व 29 हजार रुपये किंमतीची सोन्याची रिंग याचा समावेश आहे.
23 मार्च रोजी सकाळी ही बाब लक्षात आल्यावर तातडीने पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत राकेश भालचंद्र कोठावदे यांनी फिर्याद दिल्याने नवापूर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार कदम करीत आहे.
दरम्यान, शहरात चोरीचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. यामुळे रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
 

Web Title: Nawapuri: The 86,000-strong house in Navapur