नवापूर पोलिसांची मोठी कारवाई, तंबाखू जन्य पदार्थाचा 50 लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 19:43 IST2020-05-01T19:41:55+5:302020-05-01T19:43:17+5:30
नवापूर, जि नंदुरबार : महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू व गुटखा वाहतुक केला जात असतांना नवापुर पोलीसांनी ट्रकसह सुमारे ...

नवापूर पोलिसांची मोठी कारवाई, तंबाखू जन्य पदार्थाचा 50 लाखाचा मुद्देमाल जप्त
नवापूर, जि नंदुरबार : महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू व गुटखा वाहतुक केला जात असतांना नवापुर पोलीसांनी ट्रकसह सुमारे 50 लाखाचा तंबाखू जन्य पदार्थाचा साठा आज दुपारी जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक व क्लिनरला पोलीसांनी अटक केली आहे.
येथील पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना एका ट्रक मधुन तंबाखू जन्य पदार्थाची वाहतुक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारे नवापुर पोलीसांनी शहर हद्दीत नवापूर पिंपळनेर चौफुली जवळ सापळा लावला. प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यात एक ट्रक (क्र MH 31GB 8837) ची तपासणी केली असता महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा व तंबाखू आढळून आला. जीवनावश्यक वस्तूच्या वाहतुकीच्या नावा खाली महाराष्ट्रात बंदी असलेला विमल तंबाखू व गुटखा तांदुळाच्या चुरीच्या गोण्यांच्या आड लपवलेला आढळून आला. ट्रक आणि तंबाखुजन्य पदार्थ असा एकूण 50 लाख रुपये किमतीचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकात गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूरचे पोलीस निरीक्षक विजययसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगम्बर शिंपी, धीरज महाजन, पो काॅ प्रविण मोरे, दिनेश बाविस्कर,जयेश बाविस्कर, योगेश साळवे, निशान गिते, आदिनाथ गोसावी, कृष्णा पवार, गुमान पाडवी, शाम पेढारे, हेमंत सैंदाणे व सहकार्यांनी केली. पोलीसांनी केलेल्या कारवाईतुन पुन्हा गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची बाब उघड झाली आहे. गत आठवड्यात गुजरात पोलीसांनी आयशर टेम्पो आणि पिकअप मधुन होत असलेली तस्करी उघड केली होती. या प्रकरणी महाराष्ट्र जीवनावश्यक कायदा 2005 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक चालक आणि क्लिनरला ला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन व सहकारी करीत आहेत.