नवापुरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम, दोन दिवसात ८९ कुत्रे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:39 AM2021-02-25T04:39:40+5:302021-02-25T04:39:40+5:30

शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने दिले. मोर्चे काढले मात्र मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेला बंदोबस्त करता आला नव्हता. ...

In Navapur, 89 dogs were caught in two days | नवापुरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम, दोन दिवसात ८९ कुत्रे पकडले

नवापुरात मोकाट कुत्रे पकडण्याची मोहिम, दोन दिवसात ८९ कुत्रे पकडले

Next

शहरात वाढलेल्या मोकाट कुत्र्यांच्या संदर्भात

नगरपालिकेला वेळोवेळी निवेदने दिले. मोर्चे काढले मात्र मोकाट कुत्र्यांचा नगरपालिकेला बंदोबस्त करता आला नव्हता. मात्र नागरिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता नगरपालिकेने मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. नगराध्यक्षा हेमलता पाटील, मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सभापती बबिता वसावे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चव्हाण स्थानिक नगरसेवक व आरोग्य विभागाने यांच्याकडून अनेक वर्षापासून प्रलंबित मोहीम राबवण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नवापूर नगरपालिकेचे आरोग्य सभापती बबिता वसावे यांच्या पथकाने शहरातील सर्वाधिक कुत्र्यांचे प्रमाण जास्त असलेले भागात पहिल्या दिवशी ३८ कुत्रे पकडण्यात आले. दुसऱ्या दिवशी बुधवारी शहरातील विविध भागांतून ५१ कुत्रे पकडण्यात आले. साधारण दोन दिवसात ८९ कुत्रे पकडून निर्मनुष्य परिसरात सोडण्यात आले आहे. एक स्वतंत्र कुत्रे पकडणारे पथक तयार करण्यात आले आहे. नवापूर शहरातील विविध भागात जाणून कुत्रे पकडण्यात येत आहे. नवापूर शहराच्या डंपिंग ग्राउंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पिसाळलेले व मोकाट कुत्रे असल्याने लहान चिंचपाडा, गणेश हिल, वेडूभाई नगर, लखाणी पार्क, देवळीफळी पंप हाऊस,धनराट या भागातील नागरिकांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने पहिल्या दिवशी त्याच परिसरातील कुत्रे पकडण्याची मोहीम राबवली.

गेल्या वर्षी आश्रमशाळेतील बालकाचा कुत्र्याने घेतला होता बळी

नवापूर परिसरातील डम्पिंग ग्राउंडवर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस वाढल्याने गेल्यावर्षी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धनराज येथील एका बालकांवर कुत्र्याने जीवघेणा हल्ला केल्याने बालकाचे मृत्यू झाला होता नवापूर शहरातील नागरिक शहरालगत असलेले ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी पालिकेच्या मोहीमबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: In Navapur, 89 dogs were caught in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.