राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी ठेकेदार मिळेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:45 IST2020-01-02T11:45:45+5:302020-01-02T11:45:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नेत्रंग ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गाची तळोद्यापासून तर थेट गुजरात हद्दीजवळील गव्हाळीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत ...

राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी ठेकेदार मिळेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : नेत्रंग ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गाची तळोद्यापासून तर थेट गुजरात हद्दीजवळील गव्हाळीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी संबंधीत यंत्रणेने टेंडरदेखील काढले होते. मात्र काम करण्यासाठी ठेकेदार पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी रस्त्याची दुरूस्तीही रखडली आहे.
नेत्रंग ते शेवाळी हा राष्ट्रीय महामार्ग ७३ ब म्हणून ओळखला जात असतो. तथापि या रस्त्याची तळोद्यापासून तर थेट गव्हाळी म्हणजे गुजरात हद्दीपर्यंत अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथील अवजड वाहतुकीमुळे मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशीच अवस्था महामार्गाची झाली आहे. रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे वाहनधारक अक्षरश: वैतागले आहेत. त्यातच रस्त्यावर अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्यामुळे रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्याच बरोबर लोकप्रतिनिधींकडे वाहनधारकांनी लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी ठेकेदार मिळेणा महामार्गाच्या धुळे विभागाने रस्त्याची दुरूस्ती मंजूर करून त्यासाठी साधारण सात कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्याच्या कामाचे टेंडर सुद्धा काढण्यात आले होते. परंतु काम करण्यासाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे. पुन्हा नवीन टेंडरची प्रक्रिया राबविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले जात आहे.
वास्तविक सन २०११ मध्ये या रस्त्याला राज्य मार्गावरून राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी ठेकेदार मिळेणा महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. साहजिकच त्याची देखभाल, दुरूस्ती व नूतनीकरणाकरीता ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. परंतु तसे झाले नाही. केवळ थातूर-मातूर दुरूस्ती केली जात असते. वर्षभरापूर्वी अक्कलकुवा ते वाण्याविहीर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र निकृष्ठ कामाच्या दर्जामुळे त्याचीही अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सातत्याने वाहनांचा तांत्रिक बिघाडाचासामना वाहनधारकांना करावा लागत आहे. यात वेळ व पैसाही वाया जात असल्याचे वाहनचालक सांगतात. अवजड वाहनचालकांना तर तांत्रिक बिघाडामुळे रात्र-रात्र रस्त्यावरच खिळून राहावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. या महामार्गाची अत्यंत शोचनीय अवस्था लक्षात घेऊन संबंधीत यंत्रणेने पुन्हा नवीन प्रक्रिया राबवून दुरूस्तीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आहे.
तळोद्यापासून थेट गव्हाळीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातही नळगव्हाणपासून तर खूपच दुर्दशा झाली आहे. त्यामुळे मोटारसायकली व लहान चारचाकी वाहनधारक कुकरमुंडाकडून फुलवाडी गुजरातमार्गे मोरंबा मार्गे तब्बल १० ते १५ किलोमीटर अंतराचा फेरा मारत जात असतात. या पर्यायी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू झाल्याने त्याचीदेखील दुरवस्था होत आहे. वास्तविक वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातही अवजड वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत संबंधीत यंत्रणेने सुद्धा अलर्ट राहिले पाहिजे. मात्र त्याकडे पाहिजे तसे लक्ष घातले नसल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे.
हा महामार्ग केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे. कामाची निविदा कमी किमतीची निघाल्यामुळे कोणताही ठेकेदार काम घ्यायला तयार नाही. मी वैयक्तिक पातळीवर एका ठेकेदाराला तयार केले आहे. त्यामुळे लवकरच निविदा मंजूर करून कामास सुरूवात होणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते.