शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी येथे नरेंद्राचार्य महाराज पादुका पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका पूजन, प्रवचन व ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका पूजन, प्रवचन व दर्शन सोहळा विसरवाडी येथे झाला. पादुकांचे पालखीतून व्यासपीठावर आगमन झाले. सामुदायिक पादुका पूजनाचा मान घोगळपाडा गावातील भाविकांना मिळाला.या वेळी तहसीलदार सुनीता ज:हाड, कृषी आधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह भाविक उपस्थित होते. या वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य मठाचे प्रवचनकार प्रिया परब यांनी मार्गदर्शन केले. तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विज्ञान युगामुळे मनुष्याच्या जीवनात सर्व क्षेत्रात विविध सोयी उपलब्ध झाल्या असून त्याद्वारे त्यांचे शारीरिक कष्ट कमी झालेले दिसत आहे. सर्व बाजूंनी सुखासीन परिस्थिती असताना मनुष्य मानसिकदृष्टय़ा खचलेला व अशांत दिसत आहे. विज्ञान  हे मनुष्याला केवळ स्पर्धक बनवत आहे. या स्पर्धेत धावतांना मनुष्य नाते, संस्कृती, समाज विसरत चालला आहे. त्यामुळे विज्ञानाच्या मागे धावताना अध्यात्मिकता व समाज यांना विसरता कामा नये. हे दोन्हीही मानवाला घडवतात. आजच्या स्पर्धेच्या युगात हे सर्व मागे पडत चालले आहे. त्यामुळेच धर्म जागृतीसाठी संतांना हे कार्य करावे लागत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर, गुजरात व मध्य प्रदेशातील भाविक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्री संप्रदाय भक्त शिष्य मंडळ, जिल्हाध्यक्ष प्रमोद भावसार, भूषण सूर्यकांत माळी, देवीसिंग राजपूत, अनिल बागूल, संजय जगताप, दुर्योधन वळवी, महिला प्रमुख सुमनबाई कोकणी, ज्योतीसिंग चौरे, ईश्वर सूर्यवंशी, महेश अग्रवाल, रणजित गावीत, गणेश साळी, सागर केणे, गोकुळ ठाकरे, छगन गावीत, नरेंद्र कोकणी, अभिमन्यू गावीत, विजय बागूल आदींनी परिश्रम घेतले.