विसरवाडी येथे नरेंद्राचार्य महाराज पादुका पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:34 IST2019-11-16T12:34:12+5:302019-11-16T12:34:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका पूजन, प्रवचन व ...

विसरवाडी येथे नरेंद्राचार्य महाराज पादुका पूजन
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा पादुका पूजन, प्रवचन व दर्शन सोहळा विसरवाडी येथे झाला. पादुकांचे पालखीतून व्यासपीठावर आगमन झाले. सामुदायिक पादुका पूजनाचा मान घोगळपाडा गावातील भाविकांना मिळाला.
या वेळी तहसीलदार सुनीता ज:हाड, कृषी आधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांच्यासह भाविक उपस्थित होते. या वेळी जगद्गुरु नरेंद्राचार्य मठाचे प्रवचनकार प्रिया परब यांनी मार्गदर्शन केले. तसेच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. ते म्हणाले, विज्ञान युगामुळे मनुष्याच्या जीवनात सर्व क्षेत्रात विविध सोयी उपलब्ध झाल्या असून त्याद्वारे त्यांचे शारीरिक कष्ट कमी झालेले दिसत आहे. सर्व बाजूंनी सुखासीन परिस्थिती असताना मनुष्य मानसिकदृष्टय़ा खचलेला व अशांत दिसत आहे. विज्ञान हे मनुष्याला केवळ स्पर्धक बनवत आहे. या स्पर्धेत धावतांना मनुष्य नाते, संस्कृती, समाज विसरत चालला आहे. त्यामुळे विज्ञानाच्या मागे धावताना अध्यात्मिकता व समाज यांना विसरता कामा नये. हे दोन्हीही मानवाला घडवतात. आजच्या स्पर्धेच्या युगात हे सर्व मागे पडत चालले आहे. त्यामुळेच धर्म जागृतीसाठी संतांना हे कार्य करावे लागत असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर, गुजरात व मध्य प्रदेशातील भाविक उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी श्री संप्रदाय भक्त शिष्य मंडळ, जिल्हाध्यक्ष प्रमोद भावसार, भूषण सूर्यकांत माळी, देवीसिंग राजपूत, अनिल बागूल, संजय जगताप, दुर्योधन वळवी, महिला प्रमुख सुमनबाई कोकणी, ज्योतीसिंग चौरे, ईश्वर सूर्यवंशी, महेश अग्रवाल, रणजित गावीत, गणेश साळी, सागर केणे, गोकुळ ठाकरे, छगन गावीत, नरेंद्र कोकणी, अभिमन्यू गावीत, विजय बागूल आदींनी परिश्रम घेतले.