शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

कृत्रीम पाणी टंचाईने नंदुरबारकरांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:18 PM

पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पाईपलाईन फोडण्याचा अज्ञाताकडून प्रयत्न, पाच दिवसांपासून समस्या

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : गेल्या दोन आठवडय़ापासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात तर गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकलेला नाही. यासंदर्भात पालिका प्रशासनाडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत केले जात नसल्यामुळे किंवा पर्यायी व्यवस्थाही होत नसल्यामुळे शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा आहे. आणखी चार ते पाच महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. परंतु विविध तांत्रिक कारणांमुळे गेल्या आठवडय़ापासून पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. गेल्या आठवडय़ात मुख्य पाईपलाईनला नवीन व्हॉल्व बसविण्यात आला होता. त्यामुळे दोन दिवस पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. हा व्हॉल्व बसविल्यानंतर तो लागलीच दोन दिवसांनी तो लिक झाला. परिणामी पाईपलाईनमध्ये माती जात होती. त्यासाठी पुन्हा तो व्हॉल्व दुरूस्त करण्यात आला. ते काम होत नाही तोच धुळे रस्त्यावर मुख्य पाईपलाईनला कुणीतरी विघअसंतोषी व्यक्तीने खिळा ठोकून दिला होता. त्यामुळे पाईपलाईन लिकेज होत होती. त्याच्या दुरूस्तीसाठी पुर्ण पाईपलाईन बंद करावा लागली. ओलसर पणामुळे लिकेजच्या ठिकाणी वेल्डींग देखील करता येत नव्हते. परिणामी पुर्ण पाईपलाईनमधील पाणी काढून ती कोरडी करावी लागली. त्या कामाला देखील दोन दिवस लागले. त्यानंतर निर्धारित कालावधीत जलकुंभ स्वच्छता करण्यात आले. ते भरण्यासाठी पुन्हा एक दिवस गेला.या सर्व कारणांमुळे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक पुर्णत: कोलमडले आहे. धुळे रस्त्यावरील अनेक वसाहतींमध्ये चार दिवसांपासून पाणीपुरवठाच होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. याकडे अधिकारी व पदाधिका:यांनीही दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.विस्कळीत पाणीपुरवठय़ाबाबत पालिकेकडून नागरिकांना कुठल्याही प्रकारे सुचीत करण्यात आले नसल्यामुळे नागरिक अनभिज्ञ राहिले. शिवाय ज्या भागात तीनपेक्षा अधीक दिवस पाणीपुरवठा होऊ शकला नाही अशा भागात पालिकेने टँकर देखील पुरविले नसल्यामुळे नागरिकानी संताप व्यक्त केला. सोमवारी सायंकाळर्पयत वेळापत्रक कोलमडलेलेच होते. यामुळे नागरिकांच्या संतापात भर पडत आहे. उद्रेक होण्यापूर्वीच पर्यायी व्यवस्था करण्याची अपेक्षा नागरिकांकडून होत आहे.एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा..शहरात एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जातो. विरचक प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता पाणी टंचाईचा सामना शहरवासीयांना करावा लागणार नाही हे स्पष्टच आहे. मात्र, तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा वेळापत्रक विस्कळीत होते. त्यासंदर्भात पालिकेने नागरिकांना वेळोवेळी सुचीत करणे किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाहन करणे देखील आवश्यक असतांना त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.शहराला विरचक प्रकल्पातून तसेच आंबेबारा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. आंबेबारा धरणातील 50 टक्के पाणीसाठा आरक्षीत करण्यात येतो. त्यानुसार सध्या आंबेबारा धरणातून देखील आष्टे पंपींग स्टेशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकर पुरविणे आवश्यक असतांना त्याकडेही पालिकेने दुर्लक्ष केले आहे.