शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारकर ९ आकड्याच्या प्रेमात, नंबरप्लेटसाठी मोजतात हजारो रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 11:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. त्याचा प्रत्येय फॅन्सी व व्हीआयपी नंबर प्लेट मिळविण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  हौसेला मोल नसते असे म्हटले जाते. त्याचा प्रत्येय फॅन्सी व व्हीआयपी नंबर प्लेट मिळविण्यासाठी अनेकांचा आटापीटा समोर येतो. त्यासाठी हजारो आणि लाखो रुपये खर्च करण्याचीही संबधितांची तयारी असते.  यात नंदुरबार जिल्ह्यातील वाहन प्रेमी देखील मागे नसल्याचे दिसून येते. अशा नंबर प्लेटच्या माध्यमातून आरटीओ विभागाला दोन वर्षात तब्बल ७१ लाख ८८ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.                 लाखो रुपयांची अलिशान कार खरेदी करतांना त्या कारचा नंबरही लकी किंवा पसंतीचा पाहिजे अशी अनेकांची धारणा असते. अनेकांना वेगवेगळे नंबर लकी असतात. त्या अंकाचे नंबर मिळावे किंवा अंकांची बेरीज तशी यावी अशा पद्धतीने नंबर मिळविण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. चॅाईस नंबरच्या माध्यमातून महसूल मिळू शकतो हे हेरून शासनानेही कायदा करून असे नंबर विशिष्ट रक्कम भरून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. विशिष्ट नंबरसाठी विशिष्ट रक्कम भरावी लागते. यासाठी साध्या कागदावर आरटीओ विभागाकडे अर्ज करता येतो. त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यासाठीचे शुल्क भरावे लागते. एकाच नंबरची एकापेक्षा अधीक जणांनी मागणी केल्यास तो पेच सोडविण्यासाठी त्या नंबरचा लिलाव केला जातो. जो जास्त बोली लावेल त्याला तो नंबर दिला जातो.  त्यासाठीचे आरक्षण मात्र केवळ ३० दिवसांचे असते. सहसा कारसाठीच अशा नंबरची चॅाईस असते. इतर वाहनांसाठी अर्थात दुचाकी, तीन चाकी किंवा जड वाहनांना चॅाईस नंबर सहसा घेतला जात नसल्याचे चित्र आहे. 

२०१९ आरटीओची कमाई  ३४,१३,०००                                                                                                                                     २०२० (नोव्हेंबरपर्यंत) आरटीओची कमाई  ३७,७५,०००

या तीन नंबर्सना सर्वाधिक दर 

४४४४ = २,१०,००० (रुपये)                                                                                                                           ०९९९=१,५०,०००(रुपये)                                                                                                                                ५६००=०,५०,०००  (रुपये)

 ९ आकड्याच्या नंबरला नंदुरबारकरांची मागणीनंदुरबार जिल्ह्यातील वाहनमालकांची मागणी सहसा ९ या आकड्याला सर्वाधिक असल्याचे दिसून येते. सर्वाधिक किंमतीला नंबर विकले गेले त्यात ९ या आकड्याचा सर्वाधिक भरणा आहे. त्या खालोखाल ०० या आकड्यालाही बऱ्यापैकी मागणी आहे. इतक आकड्यांमध्ये ४, ६, ८ यांचीही चांगली चलती दिसून येते. किमान ४५ हजार व जास्तीत जास्त दोन लाख १० हजार रुपयांपर्यंत नंबर विक्री झाली आहेत. 

शासनाने महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम आर ५४ अंतर्गत चॅाईस नंबरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संबधीत नंबरसाठी विशिष्ट शुल्क अकारणी करण्यात येते. या माध्यमातून विभागाला चांगला महसूल मिळत आहे. यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. वाहनमालकांनी त्याचा लाभ घ्यावा. - नानासाहेब बच्छाव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.