शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

ZP Election 2020: नंदुरबारमध्ये भाजपा ठरला मोठा पक्ष, पण बहुमताचा आकडा दूरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 13:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे ५६ पैकी ४० गटांचा निकाल जाहिर झाला असून या जिल्हा परिषदेत ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या निवडणूकीचे ५६ पैकी ४० गटांचा निकाल जाहिर झाला असून या जिल्हा परिषदेत कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ दरम्यान त्रिशंकूकडे वाटचाल असल्याने निकालानंतर कोणत्या पक्षांची आघाडी होते हा उत्सुकतेचा विषय आहे़ आदिवासी विकासमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी ह्या पराभूत झाल्याने काँग्रेससाठी तो मोठा धक्का आहे़जिल्हा परिषदेचे ५६ गट व जिल्ह्यातील सहा पंचायत समितीचे ११२ गणांसाठी मंगळवारी सरासरी ६८ टक्के मतदान झाले होते़ त्याची मतमोजणी बुधवारी सकाळी १० पासून सुरु झाली़ दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे ४० गटांची मतमोजणी पूर्णत्त्वास आली असून त्यात सर्वाधिक १७ जागा भाजपाला मिळाल्या आहेत़ त्यापाठोपाठ काँग्रेसला १५, शिवसेना पाच व राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा मिळाल्या आहेत़ उर्वरित १६ गटांची मतमोजणी बाकी आहे़ त्यातील प्राथमिक चित्र पाहता कुणाही एका पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे स्पष्ट आहे़नेत्यांचे वारसदार विजयीया निवडणूकीत जवळपास जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेत्यांचे वारसदार आपले भाग्य आजमावित होते़ त्यात ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे दोन्ही पुत्र अजित नाईक व दिपक नाईक हे विजयी झाले आहेत़ माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या कन्या अ‍ॅड़ सिमा वळवी, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे पुत्र अभिजीत पाटील, शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी हे विजयी झाले आहेत़ सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या देखील लोणखेडा गटातून विजयी झाल्या आहेत़अनेकांना पराभवाचा धक्काअनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे़ त्यात आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी या तोरणमाळ ता़ धडगाव गटातून पराभूत झाल्या आहेत़ त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराने पराभूत केले आहे़ तर काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक हे खांडबारा गटातून पराभूत झाले आहेत़ जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती डॉ़ भगवान पाटील हे देखील म्हसावद गटातून पराभूत झाले आहेत़

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना