Nandurbar: खड्ड्यांमुळे दुचाकी उधळून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू
By मनोज शेलार | Updated: October 14, 2023 18:41 IST2023-10-14T18:41:44+5:302023-10-14T18:41:59+5:30
Nandurbar: खराब रस्त्यांमुळे दुचाकी उधळून मागे बसलेली महिला पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना धडगाव-मोलगी रस्त्यावर सुरवाणी गावाजवळ घडली. याप्रकरणी शुक्रवारी दुचाकी चालकाविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nandurbar: खड्ड्यांमुळे दुचाकी उधळून खाली पडल्याने महिलेचा मृत्यू
- मनोज शेलार
नंदुरबार - खराब रस्त्यांमुळे दुचाकी उधळून मागे बसलेली महिला पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना धडगाव-मोलगी रस्त्यावर सुरवाणी गावाजवळ घडली. याप्रकरणी शुक्रवारी दुचाकी चालकाविरुद्ध धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकराबाई बाजीराव पाडवी (४३) रा. हातधुई-तोरखापाडा, ता. धडगाव असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, भिमसिंग ठोबड्या पावरा (३५) रा. हातधुई हे आपल्या दुचाकीने धडगावकडून मोलगीकडे जात होते. सुरवाणी गावाजवळ गॅस गोडाऊनजवळ खराब रस्ता असतानाही पाडवी याने दुचाकी भरधाव चालवून नेली. त्यामुळे मागे बसलेल्या साकराबाई पाडवी या खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास व हातापायांना जबर मार लागला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बाजीराव पाडवी यांनी फिर्याद दिल्याने दुचाकी चालक भिमसिंग पावरा यांच्याविरुद्ध धडगाव पोलिसांत निष्काळजीपणे वाहन चालविल्याने धडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार दीपक वारुळे करीत आहेत.