शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नंदुरबार रेल्वे स्थानकाचे रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:00 PM

नंदुरबार : ताप्ती सेक्सशनवरील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नंदुरबार या मध्यवर्ती स्थानकाला महत्त्व आले आहे. त्यामुळे या स्थानकाचे रूप ...

नंदुरबार : ताप्ती सेक्सशनवरील रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाल्यानंतर नंदुरबार या मध्यवर्ती स्थानकाला महत्त्व आले आहे. त्यामुळे या स्थानकाचे रूप पालटू लागले आहे. विविध कामांना येथे सुरुवात झाली आहे. सुरुवातीला फलाटफार्म नंबर एक वरील कामे पुर्ण करण्यात येणार आहेत. दरम्यान, या कामांसह आता दुस:या पादचारी पुलाबाबत देखील निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.भुसावळ-सुरत रेल्वे मार्गाचे नुकतेच दुहेरीकरण पुर्ण झाले आहे. यामुळे पश्चिम रेल्वेच्या नंदुरबार स्थानकाला महत्व आले आहे. पश्चिम व मध्य रेल्वेला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून पश्चिम आणि उत्तरसह दक्षिण भारताला जोडणा:या अनेक गाडय़ा या मार्गाने सुरू झाल्या आहेत. परिणामी नंदुरबारातील रेल्वे स्थानकावरील दळणवळण वाढले आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे स्थानकातील विविध कामांनाही वेग देण्यात आला आहे.फलाटफार्मचे कामस्थानकातील एक नंबरच्या फ्लॅटफार्मचे काम सुरू करण्यात आले आहे. जुन्या स्टाईल काढून टाकल्या जात आहे. त्यावर पिवळे पट्टे  मारण्यात येणार आहेत. जेणेकरून रेल्वे येतांना व जातांना प्रवाशांना त्यापासून सुरक्षीत अंतरावर उभे राहता येईल. शिवाय इतर मोठय़ा स्थानकांप्रमाणे सेन्सर देखील लावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.रूळ बदलण्याचेही कामस्थानकातील फ्लॅटफॉर्म एक वरील रुळ देखील बदलण्यात येत आहेत. जुने रुळ झाल्यामुळे या ठिकाणी स्वच्छतेसाठी मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे या ठिकाणी नव्याने रुळ टाकून स्लिपर टाकतांना त्याखाली सहज स्वच्छता करता येईल अशा पद्धतीने उपाययोजना करण्यात येणार    आहेत. यामुळे रेल्वे स्थानकावरील दरुगधीला आळा बसू शकणार असून स्वच्छता देखील काय राहण्यास मदत होणार आहे.पाईपही बदलणाररेल्वेत पाणी भरण्यासाठी तसेच स्वच्छतेसाठी येथे असलेली पाईपलाईन आणि नळ देखील बदलण्यात येत आहेत. पाणी वाया जावू नये व कमीत कमी मणुष्यबळाची गरज लागावी यादृष्टीने अत्याधुनिक पद्धतीची पाईपलाईन राहणार आहे. रंगरंगोटीलाही सुरुवातस्थानकाच्या रंगरंगोटीलाही सुरुवात करण्यात आली आहे. तिन्ही फ्लॅटफॉर्म, इमारत, पादचारी पूल यासह प्रतिक्षा गृहाला रंगकाम केले जात आहे. तीन महिन्यात ही सर्व कामे पुर्ण करण्याचे आदेश रेल्वेने संबधीत ठेकेदाराला दिले आहेत.इमारत मात्र जुनीचरेल्वे मार्ग दुहेरीकरणाअंतर्गत उधना ते धरणगाव दरम्यानचे अनेक रेल्वे स्थानकांच्या इमारतींचे काम नव्याने करण्यात आले आहे.    नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या इमारतीचे काम देखील नव्याने करण्याचे प्रस्तावीत होते. परंतु ब्रिटीशकालीन ऐतिहिासीक ठेवा असल्यामुळे व सुस्थितीतील इमारत असल्यामुळे काही वर्ष ही इमारत राहू द्यावी अशी मागणी पुढे आली. परिणामी इमारतीचे काम पुर्ण होऊ शकले नाही.