नंदूरबारमध्ये खासगी बस ४० फूट खोल दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू; ३५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 10:30 IST2020-10-21T10:28:23+5:302020-10-21T10:30:01+5:30

Nandurbar Accident News: मध्यरात्री खासगी बसला अपघात; जखमींवर उपचार सुरू

in nandurbar passenger bus falls into into 40 foot deep gorge 5 died and 35 injured | नंदूरबारमध्ये खासगी बस ४० फूट खोल दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू; ३५ जखमी

नंदूरबारमध्ये खासगी बस ४० फूट खोल दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू; ३५ जखमी

नंदूरबार: धुळे-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला. जळगावहून सूरतकडे जाणारी खासगी बस कोंडाईबारी घाटातील दर्ग्याजवळील पुलावरून ४० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींवर विसरवडी, नवापूर व नंदुरबारमधल्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मध्यरात्री २ च्या सुमारास हा अपघात झाला.




अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे. हा अपघात कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ४० प्रवासी होते. 

Web Title: in nandurbar passenger bus falls into into 40 foot deep gorge 5 died and 35 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.