नंदूरबार : नवापूर तालुक्यात मोटरसायकलींच्या भीषण अपघातात एक ठार
By भूषण.विजय.रामराजे | Updated: April 25, 2023 17:56 IST2023-04-25T17:56:21+5:302023-04-25T17:56:40+5:30
धडक देणाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

नंदूरबार : नवापूर तालुक्यात मोटरसायकलींच्या भीषण अपघातात एक ठार
नंदुरबार : नवापूर तालुक्यातील खांडबारा-शेही गावादरम्यान भरधाव वेगातील मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन एक ठार, तर चाैघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला. याप्रकरणी धडक देणाऱ्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
नवापूर तालुक्यातील वडदा येथील मोतीलाल रायसिंग कोकणी, रवींद्र नाईक व आत्माराम कोकणी हे तिघे जण खांडबारा येथून काम आटोपून डोगेगाव रस्त्याने वडदा गावाकडे दुचाकी वाहनाने (क्र. जीजे- १९, एके- ६४०९) जात असताना श्रावणी गावाजवळ समाेरून येणाऱ्या मोटारसायकलीने (क्र. जीजे- १९, एएल- २७३६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेत मोतीलाल रायसिंग कोकणी (वय ६०) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
मागे बसलेले रवींद्र नाईक व आत्माराम कोकणी हे दोघेही, तसेच समोरील मोटारसायकलीवरील दोघे असे चाैघेजण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बन्सीलाल मोतीराम कोकणी (रा. वडदा) यांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणारा मोटारसायकलस्वार धनराज अभिमन कोकणी (२५, रा. वाटवी, ता. नवापूर) याच्याविराेधात गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सुरेश मोरे करीत आहेत.