शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

नंदुरबारला गरज ‘सुरक्षेच्या’ शिक्षणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवसेंदिवस वाढीस लागत असलेल्या कोरोना संसर्गापासून नागरिकांनी स्वत:चा बचाव करावा असे आवाहन शासन व प्रशासन दररोज करत आहे़ परंतु नंदुरबार शहरात मात्र सर्वकाही आलबेल असल्याच्या थाटात नागरीक वावरत असून दोन पोलीस ठाण्यांनी सुमारे ५०० जणांवर कारवाई करुन मास्क वापराबाबत गांभिर्य नसल्याचे चित्र पुन्हा दिसून आले़जिल्ह्यात कोरोनबाधितांचा आकडा येत्या काही दिवसात १ हजाराच्या पुढे जाणार आहे़ मयतांची संख्या आधीच वाढून ५० च्या जवळ गेली आहे़ या पार्श्वभूमीवर शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांना किमान मास्क लावून यावे असा आग्रह प्रशासनाचा आहे़ परंतु बरेच नागरिक मात्र हा आग्रह मोडून संसर्गाला खतपाणी घालत असल्याचे दिसून आले आहे़ ‘लोकमत’ने शहरातील मास्क वापराबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेकांना मास्क वापरण्याची कोणतीही गरज नसल्याच्या त्यांच्या वागण्या बोलण्यातून दिसून येत होता़ मास्कचा वापर हा सार्वजनिक जागी तसेच सोशल डिस्टन्सिंग नसल्यास प्रभावी ठरत असतानाही अनेक जण त्याकडे कानाडोळा करत असल्याचे दिसून आले़ शहरातील सुभाष चौक, हाटदरवाजा, सराफ बाजार, मंगळबाजार, नेहरू चौक परिसरात अनेक जण विनामास्क वापरता फिरत असल्याचे सहज नजरेस पडत होते़ बहुतेक जण दुचाकींवर तीन सीट बसूनही मास्कचा वापर करत नसल्याचे समोर आले़ काही व्यावसायिक अर्धवट मास्कचा वापर करुन सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत होते़ यातून नंदुरबार शहरात वावरणाºया नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे समोर आले आहे़कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा जिल्हाधिकारी यांनी लागू करत मनाई आदेश काढले आहेत़ सोबत साथरोग प्रतिबंधात्मक कायदाही लागू करण्यात आला आहे़ या कायद्यांन्वये उपाययोजना न करता सार्वजनिक ठिकाणी फिरणे गुन्हा ठरतो़दोन्ही कायदे लागू असतानाही शहरातील उपनगर पोलीस हद्द व शहर पोलीस ठाणे हद्दीत अनेकजण मास्क विना फिरत असल्याचे समोर आले होते़ शहर पोलीस ठाणे हद्दीत कायदा लागू झाल्यापासून आजअखेरीस ३०० तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीत ११५ जणांवर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांच्यावर न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे़दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दर दिवशी दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल होत असतानाही मास्कविना फिरणारे आढळून येत आहेत़ दोन्ही ठाण्यात दररोज किमान चार जणांवर गुन्हे दाखल होतात़समोरासमोर येणाºया दोघांनी मास्क घातला असेल तर संसर्गाचा धोका कमी असतो़ एकाने मास्क न घालणे व दुसºयाने घालणे यातून तसेच मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास कोरोनाचा संसर्ग वाढतो़ नागरिकांनी योग्य त्या पद्धतीने मास्कचा वापर करावा़ मास्क वापरण्याआधी स्वत:चे हात स्वच्छपणे धुऊन वापरल्यास संसर्गाचा धोका कमी होता़-डॉ़ हार्दिक पटेल, साथरोग नियंत्रण तज्ञ, नंदुरबाऱ